सुषमाताई अंधारे यांच्याकडून हिंदुत्व शिकावं, इतके वाईट दिवस आलेत का आपले?

151

सुषमा अंधारे सध्या ठाकरे गटात आल्या आहेत. एखादी व्यक्ती ज्यावेळी नवीन प्रवेश करते तेव्हा ती आपण किती निष्ठावान आहोत हे दाखवण्याचा अभिनय करत असते. कारण अनेक काळापासून असलेल्या निष्ठावानांशी त्यांना स्पर्धा करायची असते व प्रमुखाचा विश्वास जिंकायचा असतो. या न्यायाने सुषमा अंधारे वागत आहेत आणि ह्यात काही गैर नाही. पण निष्ठा दाखवत असताना, आपण काही दिवसांपूर्वी जे बोलत होतो, त्याच्या अगदी विरोधात बोलतोय याचं भान असायला हवं.

सुषमाताई या स्वयंघोषित पुरोगामी नेत्या आहेत. त्या जोशात बोलतात, आक्रमक आहेत. स्त्रियांनी आक्रमक असायलाच हवं. सुषमाताई ज्या पद्धतीने बोलतात, ते श्रवणीय नसलं तरी आजच्या काळात कलेकडे पाहण्याची लोकांची दृष्टी बदलली आहे. म्हणजे उद्धव ठाकरे यांचं ’उत्कंठादमन’ करणारं फेसबुक लाईव्ह ऐकून मंत्रमुग्ध झालेले या महाराष्ट्राने आपल्या आश्चर्यकारक नजरेने पाहिले आहे. त्यामुळे सुषमाताई जे काही बोलतात, त्यानंतर काही लोकांना टाळ्या वाजवाव्याश्या वाटतात त्यात आश्चर्य वाटून घेण्यासारखं काही नाही.

(हेही वाचा ‘आदिपुरुष’ चित्रपट : पौराणिक चित्रपट धर्मग्रंथ अभ्यासून बनवावेत – हिंदु जनजागृती समिती)

ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात निष्ठावंतांना डावलून संजय राऊत यांनी कमतरता भासू नये म्हणू नुकत्याच आलेल्या सुषमाताई अंधारे यांना भाषण करायची संधी उद्धव ठाकरेंनी दिली, ह्यात ठाकरे ह्रदय किती मोठे आहे हेच दिसते. आपली स्तुती आणि विरोधकांची उणीधुणी काढणार्‍यांना ठाकरे गटात निष्ठावान म्हटले जाते. असो.

सुषमाताई अंधारे गेली अनेक वर्षे हिंदू-विरोधी म्हणून प्रख्यात होत्या. त्यांनी आयुष्यभर हिंदूंवर, हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर, हिंदू देवी-देवतांवर गलिच्छ भाषेत टीका केली. नवरात्रीदरम्यान देवीला उद्देशून त्यांनी अतिशय घाणेरडं घाषण करत ’देवी बसली’ अशाप्रकारची अमानुष टिका केली आहे. सहिष्णू हिंदुंनी फार फार तर सोशल मीडियावर त्यांच्यावर टिका केली. सुषमाताई अंधारे ह्या स्त्री असून इतक्या खालच्या दर्जाची भाषा वापरु शकतात, हे एक मुलगा म्हणून मला खटकतं. मी विचार करतो की आपल्या आईने अशी घाणेरडी भाषा वापरली, तर आपली काय प्रतिक्रिया असेल? पण ती सुषमाताईंची अभिव्यक्ती आहे, कायद्याने त्यांना हिंदूंना दुखावण्याचा, त्यांच्या श्रद्धा पायदळी तुडवण्याचा, हिंदूंच्या डोळ्यांत अश्रू आणण्याचा अधिकार दिला आहे आणि मला तो अधिकार त्यांच्याकडून हिरावून घ्यायचा नाही.

(हेही वाचा नाशिक बस दुर्घटनेवर पंतप्रधानांनी व्यक्त केली हळहळ; मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख, तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर)

तरी दसरा मेळाव्यात सुषमाताईने जो काही यू-टर्न घेतलाय, ते पाहून रस्ता तयार करणारे इंजिनियर मंडळींनी देखील तोंडात बोट घातलं. सुषमाताई दसरा मेळाव्यात हिंदू-रणरागिणी म्हणून समोर आल्या. त्या ज्या प्रकारे बोलत होत्या, त्या आवेशावरुन त्यांनी आपलं सबंध आयुष्य हिंदुहितासाठी खर्च केलेलं दिसलं. त्यांनी एकनाथ शिंदे, नारायण राणे यांच्यासह अनेकांच्या हिंदुत्वावर शंका घेतली. त्यांनी जोरदार भाषण करत जमलेल्या ठाकरे गटाला हिंदुत्व शिकवलं आणि त्यांना मंत्रमुग्ध केलं. आणि हे सगळं पाहून माझ्यासारखे अनेक हिंदुत्ववादी लाजले.

आपण आपल्या विचारांशी प्रामाणिक नसलो तर लोक आपल्याला विचारणार देखील नाहीत. कन्हैया कुमार देखील कालपर्यंत कम्युनिस्ट होते, आता राहुल गांधींच्या नादी लागून बिचारे जनेऊधारी ब्राह्मण झाले. यू-टर्न घेण्याची जी खुबी या लोकांमध्ये आहे, ती अद्भुत आहे. माझ्या ओळखीचे “सरडे” नावाचे एक गृहस्थ होते. आडणाव सरडे असले तरी त्यांनी कधी रंग बदलले नाहीत. पण काही लोक रंग बदलण्याच्या प्रतिस्पर्धेत अव्वल येतात. अभिनय सम्राट अमिताभ बच्चन ह्यांनाच डोळ्यांसमोर ठेवून अभिनय करत असेल का?

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.