‘आदिपुरुष’ चित्रपट : पौराणिक चित्रपट धर्मग्रंथ अभ्यासून बनवावेत – हिंदु जनजागृती समिती

90

‘आदिपुरुष’ या प्रभू श्रीरामांवर आधारित आगामी चित्रपटाचा टीझर प्रसिद्ध झाला आणि त्यावर अनेक आक्षेप घेतले जात आहेत, काही जण या चित्रपटाचे समर्थनही करत आहेत. खरेतर प्रभू श्रीरामांवर भव्य चित्रपट बनवणे, हे स्तुत्यच आहे; पण तो बनवतांना जर वास्तवाला फाटा देऊन काल्पनिकतेला महत्त्व दिले, तर असत्य इतिहास समाजावर बिंबवण्याचे पाप आपल्या माथी येते. ‘आदिपुरूष’ या चित्रपटाच्या टीझरमधून नेमके हेच ध्यानात येत आहे. या चित्रपटात पौराणिक संदर्भ सोडून जी काल्पनिक दृश्ये दाखवली आहेत, ती आक्षेपार्ह आहेत. याचा हिंदु जनजागृती समिती निषेध करते. प्रभू श्रीराम हे संपूर्ण हिंदु समाजाचे आराध्य दैवत आहे. त्यांच्यावर आधारित चित्रपट हा कलास्वातंत्र्याच्या नावाखाली काल्पनिक न बनवता धर्मग्रंथांचा अभ्यास करून बनवायला हवा, असे मत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

दिग्दर्शक ओम राऊत यांनी यापूर्वी चांगले चित्रपट बनवले आहेत, त्यामुळे या चित्रपटातूनही त्यांनी चांगला प्रयत्न केला असू शकतो; पण टीझरमधून तरी वरील काहीच आक्षेप लक्षात आले आहेत. पूर्ण चित्रपटात आणखीही आक्षेपार्ह दृश्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी हिंदु जनजागृती समिती ओम राऊत यांच्याकडे मागणी करत आहे की, चित्रपट प्रदर्शनापूर्वी संत-महंत, इतिहास अभ्यासक, हिंदु संघटनांचे प्रतिनिधी यांना दाखवून त्यांच्या शंकांचे निरसन करावे आणि मगच चित्रपट प्रदर्शित करावा. आजकाल चित्रपटाबद्दल वाद निर्माण करून गल्ला भरणारे अनेक चित्रपट निर्माते आहेत. आपणही त्यांच्याप्रमाणे होऊ नये, अशी अपेक्षाही समितीने व्यक्त केली आहे.

(हेही वाचा अभियंत्यांच्या मागणीवर पुन्हा आयुक्तांचे दुर्लक्ष; मुख्यमंत्र्यांना दिलेल्या शब्दांचा पडला विसर)

चित्रपटाच्या टीझरमधील आक्षेपार्ह मुद्दे –  

  • हनुमानाची वस्रे चामड्याची दाखवणे, तसेच मुकुट धारण केलेला नसणे : याबद्दल मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही आक्षेप नोंदवला आहे. हनुमान चालिसेतील श्लोकांमध्ये हनुमानाच्या वस्त्रांचेही वर्णन आहे, त्याप्रमाणे हनुमानाची वेशभूषा असायला हवी; मात्र येथे तशी वेशभूषा केलेली नाही.
  • हनुमानाला दाढी दाखवली; मात्र मिशी नाही : अशी केशभूषा हिंदूंच्या कोणत्याही देवतांची नाही. याउलट मिशी न ठेवता दाढी ठेवणे, ही मुसलमानांची पद्धत आहे. हिंदु देवतेला असे दाखवणे हिंदु समाज कधीही सहन करणार नाही.
  • स्लीवलेस वस्त्रांमध्ये माता सीता : माता सीतेसारख्या भूदेवीला असे दाखवणे अत्यंत अयोग्य आहे.
  • मोगलांप्रमाणे रावणाची व्यक्तीरेखा : रावणाने तप करून शंकराला प्रसन्न केले होते, तो प्रकांड पंडीत ब्राह्मण होता; मात्र अहंकार आणि दुर्जनप्रवृत्ती यांमुळे त्याचा नाश झाला. त्याची तुलना मोगल आक्रमकांशी कदापी करता येणार नाही.
  • रावणाचे पुष्पक विमान : हे ॲनिमेटेड क्रूर पक्षाचे दाखवण्यात आले आहे. हे अत्यंत अयोग्य आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.