मुंबई- कुर्ल्यातील रहिवासी इमारतीला भीषण आग; काही नागरिक अडकल्याची भीती

167

मुंबई- कुर्ल्यातील एका रहिवासी इमारतीला भीषण आग लागली आहे. या टोलेजंग इमारतीत काही नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कुर्ल्यातील नवीन टीळक नगर परिसरात ही घटना घडली आहे. सध्या अग्नीशमन दलाकडून बचावकार्य सुरु आहे. अद्याप आग लागण्याचे कारण समजू शकलेले नाही. इमारतीत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. दोन जण इमारतीच्या कठड्यावर अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या इमारतीतील काही नागरिक दोरीचा आधार घेत बाहेर पडत आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस येथील टिळक नगर येथे असलेल्या रेल व्हीव या इमारतीला आग लागली आहे.

( हेही वाचा: नाशिक बस अपघातात मृतांचा आकडा वाढला; 12 जणांचा मृत्यू, मदतकार्य सुरुच )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.