विमान प्रवास होणार स्वस्त! सुरू होणार 26 नव्या फ्लाईट्स, जाणून घ्या मार्गासह भाडं

96

देशांतर्गत विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता आणखी पर्याय मिळणार असून देशाच्या विविध भागात जाण्यासाठी विमानसेवा उपलब्ध होणार आहे. स्पाईसजेटने देशांतर्गत उड्डाणांमध्ये आपला सहभाग वाढवण्यासाठी 26 नवीन देशांतर्गत उड्डाणं म्हणजे फ्लाईट्स सुरू करण्याची घोषणा केली आहे. जुन्या मार्गांवर फ्लाईट्सची संख्याही वाढवणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे प्रवाशांना विविध शहरात जाण्याची संधी मिळणार आहे. असे असले तरी विमान भाड्यावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या शहरात सुरू होणार 26 नव्या फ्लाईट्स

मंगळवारी यासंदर्भात स्पाइसजेटने महत्त्वाची घोषणा केली असून कंपनीने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले की, 22 जुलैपासून 26 नवीन देशांतर्गत फ्लाईट्स सुरू होणार आहे. हे नवे फ्लाईट्स मुंबई-गुवाहाटी, झारसुगुडा-मदुराई, नाशिक-दिल्ली, हैदराबाद-जम्मू, कोलकाता-जबलपूर मार्ग आणि वाराणसी-अहमदाबाद या मार्गांवर धावणार आहेत. याशिवाय अमृतसर-अहमदाबाद, दिल्ली-हैदराबाद, अहमदाबाद-जयपूर आणि दिल्ली-धर्मशाला या मार्गांवर आधीपासून चालणाऱ्या फ्लाइटची संख्याही वाढवण्यात येणार आहे.

बोईंग-737, क्यू 400 विमानांचा होणार वापर

स्पाईसजेट कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या शहरांमध्ये सुरू होणाऱ्या उड्डाणांसाठी ते स्पाईसजेट बोईंग-737 आणि क्यू 400 विमानांचा वापर करणार आहे. या विमानांचे भाडे निश्चित करण्यात आले आहे. यासह कंपनीने असेही सांगितले की, त्यांच्या नवीन फ्लाइटचे भाडे प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तुलनेत तर्कसंगत ठेवण्यात आले आहे, जे प्रत्येकाला परवडेल. नवीन शहरांमध्ये विमान सेवा सुरू केल्याने त्या शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढणार असून ज्याचा परिणाम तेथील लोकांच्या राहणीमानावर देखील होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.