सावरकरांचे वारसदार म्हणायला सेनेला लाज वाटते का?

79

दोन दिवसांपूर्वी संसदेत खासदारांचे निलंबन झाले. तेव्हा माफी मागायला आम्ही सावरकर आहोत का?, असे शिवसेनेचे खासदार म्हणतात, हा निर्लज्जपणा आहे, सावरकरांचे वारसदार आहोत, असे म्हणायला सेनेला लाज वाटते का?, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना केली आहे. साहित्य संमेलन नगरीला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव द्यावे, असा आग्रह काही मंडळींनी धरला होता. मात्र, तो नाकारण्यात आला. त्यावरून वादही झाला होता. या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी नाराजी व्यक्त करत ट्विट केले.

सावरकर यांचे साहित्यासाठी योगदान मोठे

वीर सावरकर हे केवळ स्वातंत्र्यवीरच नाही, तर साहित्यातील सर्व अंगांनी परिपूर्ण कवि, नाटककार, कादंबरीकार, निबंधकार, पत्रलेखक, चरित्रलेखक, आत्मचरित्र लेखक, व्याकरणकार, पत्रकार, इतिहासकार आणि ज्यांनी मराठीला अनेक शब्द दिले, त्यांचे नाव साहित्यनगरीला न देण्याचा हट्ट कशासाठी? सावरकर यांचे योगदान मोठे आहे, गती असलेले ते साहित्यिक होते, त्यांचे नाव देऊ नये म्हणून कुसुमाग्रज यांचे नाव दिले. असे सांगत आपली नाराजी फडणवीस म्हणाले. नाशिक ही स्वातंत्र्यवीरांची जन्मभूमी आणि कर्मभूमी सुद्धा आहे. अ.भा. मराठी साहित्य संमेलन, अ. भा. मराठी नाट्य संमेलन आणि मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषविलेले. असे तिन्ही बहुमान मिळालेले कदाचित ते एकमेव! या नगरीला कुसुमाग्रजांचे नाव दिले, याचे स्वागतच. पण केवळ स्वातंत्र्यवीरांचे नाव न देण्याच्या अट्टाहासातून त्यांचे नाव देण्यातून या दोन्ही महनियांची उंची आपण कमी करीत नाही का?, असा प्रश्नही फडणवीस यांनी केला.

सावरकरांचा अपमान होणाऱ्या संमेलनात जाणार नाही

साहित्य संमेलनास विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली अनुपस्थित दाखवली. जेथे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान होणार असेल तिथे मी जाणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा गांधी-नेहरू यांची पत्रे हाच खरा माफीनामा! रणजित सावरकरांचा घणाघाती हल्ला)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.