आता भास्कर जाधवांना पोलिस संरक्षण मिळणार

75

ओबीसी आरक्षणासंबंधी भाजपच्या आमदारांनी विधानसभेत गदारोळ केला. त्यामुळे भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले. त्याच्या निषेधार्थ भाजपने राज्यभर आंदोलने सुरू केली. मात्र आता सरकारने या आंदोलनाची दखल घेतली असून, विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांना पोलिस संरक्षण देण्यात येणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

काय म्हणाले गृहमंत्री?

विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांना संरक्षण पुरवण्याची मागणी काही विधानसभा सदस्यांनी विधानसभेत केली. त्यावर उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी भास्कर जाधव यांना पोलिस संरक्षण देण्याबाबत माहिती दिली.

(हेही वाचाः शिवसेना-भाजप युतीवर मुख्यमंत्र्यांचे भन्नाट उत्तर! म्हणाले, ‘यांना’ सोडून कुठे जाणार?)

नेमकं काय घडलं सभागृहात?

विधानसभा अध्यक्षपदी तालिका अध्यक्ष म्हणून शिवसेना आमदार भास्कर जाधव विराजमान झाले होते.अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसींच्या आरक्षणावरुन मांडलेल्या मुद्यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हरकतीचा मुद्दा मांडण्याची संधी मागितली. पण तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी ती संधी नाकारल्यामुळे भाजप आमदार आक्रमक झाले. तालिका अध्यक्ष असलेल्या भास्कर जाधव यांचा माईक हिसकावण्याचा प्रयत्न भाजप आमदांरानी केला. त्यानंतर तालिका अध्यक्षांनी 10 मिनिटांसाठी सभागृह तहकूब केले. सभागृह तहकूब केल्यानंतर विरोधी पक्षनेत्यांना बोलू दिले नाही, म्हणून भाजप आमदार अध्यक्षांच्या दालनात जाब विचारण्यासाठी गेले. त्यावेळी धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला होता. अखेर तालिका अध्यक्षांना शिवीगाळ आणि त्यांच्यासोबत हमरीतुमरी करुन गैरवर्तन केल्याप्रकरणी 12 आमदारांच्या निलंबनाचा ठराव संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी मांडला. या प्रस्तावाला बहुमताने मंजूर करण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.