Lok Sabha Election 2024 : राजू पारवेंनी आधी भरला उमेदवारी अर्ज, नंतर शिंदे गटाने जाहीर केली उमेदवारी

128

लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) एकनाथ शिंदे गटाने पहिली उमेदवारी यादी जाहीर केली. ही यादी गुरुवार, २८ मार्च रोजी जाहीर करण्यात आली. त्यात रामटेक येथील मतदारसंघाची उमेदवारी राजू पारवे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांनी २७ मार्च रोजी उमेदवारी अर्ज भरला, त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.

यावरून राजू पारवे अर्ज भरेपर्यंत त्यांची उमेदवारी शिंदे गटाने अधिकृतपणे जाहीर केली नाही. कारण महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ५ लोकसभा मतदार आहेत. त्यामध्ये रामटेक आहे आणि रामटेक मतदार संघात (Lok Sabha Election 2024) उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २७ मार्च होती. त्यामुळे महायुतीकडून कुणी अर्ज भरला याविषयी गुपित ठेवण्यात आले होते, अखेर २८ मार्च रोजी राजू पारवे यांची उमेदवारी गुरुवारी जाहीर करण्यात आली. शिंदे गटाने त्यांची पहिली 8 उमेदवारांची यादी जाहीर केली.

(हेही वाचा Lok Sabha election 2024 : लोकसभा निवडणुकीत ‘भाभीं’चा बोलबाला)

शिंदे गटाच्या ८ उमेदवारांची यादी 

  • कोल्हापूर – संजय मंडलिक
  • हातकलंगणेकर – धैर्यशील माने
  • बुलढाणा – प्रतापराव जाधव
  • दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे
  • मावळ – श्रीरंग बारणे
  • रामटेक – राजू पारवे
  • हिंगोली – हेमंत पाटील
  • शिर्डी – सदाशिव लोखंडे

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.