Lok Sabha election 2024 : लोकसभा निवडणुकीत ‘भाभीं’चा बोलबाला

165

लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha election 2024) महिला उमेदवारांची विशेष चर्चा असते. त्याप्रमाणे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही चर्चा सूरू आहे. कारण या राज्यातील मोठे नेते आपली लोकप्रियता कॅश करण्यासाठी स्वतः विधानसभेच्या रिंगणात उतरणे पसंत करतात. कारण त्यांचे लक्ष्य राज्याचे मुख्यमंत्री होणे असते. लोकसभेची निवडणूक (Lok Sabha election 2024) असेल तर मात्र आपल्या पत्नीला ते पुढे करतात. तीच गोष्ट या दोन राज्यातील बाहुबलींची आहे. त्यांना कायदा लक्षात घेऊन निवडणूक लढवणे अडचणीचे ठरते. शिवाय विजयी झाल्यावर अपात्र ठरण्याचा धोकाही असतो. यामुळे ही मंडळी त्यांच्या पत्नीलाच रिंगणात उतरवतात.

डिंपल यादव

उत्तर प्रदेशच्या राजकारणातील भाभीबद्दल बोलायचे झाले तर पहिले नाव अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांचे येते. मैनपुरी येथून त्या रिंगणात आहेत. सासरे मुलायम सिंग यादव यांच्या निधनानंतर झालेली पोटनिवडणूक त्यांनी जिंकली होती. मैनपुरी समाजवादी पक्षाचा गड समजला जातो. यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे.

अपर्णा यादव

अखिलेश यादव यांचे धाकटे बंधू प्रतीक यादव यांची पत्नी अपर्णा यादव भारतीय जनता पक्षांकडून निवडणूक (Lok Sabha election 2024) लढवीत आहेत. त्यांना मैनपुरी येथूनच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तसे झाले तर दोन जावांमधील ही लढत रंगण्याची शक्यता आहे.

अनितादेवी

बाहुबली अशोक महतो यांची पत्नी अनितादेवी राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवार म्हणून मुंगेर येथून रिंगणात आहेत. बिहारमधील कुख्यात टोळीशी महतो यांचा संबंध सांगितला जातो.

(हेही वाचा Govinda Joins Shivsena : गोविंदाचा शिवसेनेत पक्षप्रवेश; लोकसभा लढवणार ?)

अरुणादेवी

अशोक महतोंच्या काळात आणखी एक नाव चर्चेत होते. ते म्हणजे अखिलेश सिंह यांच्या पत्नी अरुणा देवी. त्या सध्या वारसली गंज येथील आमदार आहेत. आमदारकीची चौथी टर्म आहे. आता नवादा येथून लोकसभेची (Lok Sabha election 2024) उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

लवली आनंद

बाहुबली आनंद मोहनची पत्नी लवली आनंदला बिहारमध्ये संयुक्त जनता दलाने शिवहर येथून उमेदवारी दिली आहे.

नीलम देवी

आणखी एक बाहुबली अनंत सिंह यांची पत्नी नीलम देवीला लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. अनंत सिंह तुरुंगात असताना नीलम यांनी मोकमा येथून पोटनिवडणूक लढविली होती व जिंकली होती.

(हेही वाचा Lok Sabha Election 2024 : रामटेकमध्ये काँग्रेसला धक्का; रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज ठरला अवैध; कारण…)

महाराष्ट्र

महाराष्ट्रामधून देखील बारामती लोकसभा मतदारसंघ (Lok Sabha election 2024) विशेष चर्चेत आहे. कारण वाहिनी सुनेत्रा अजित पवार यांना बारामतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे या मतदारसंघाकडे देशाचे विशेष लक्ष लागले आहे. पवार विरुद्ध पवार असल्यामुळे निवडणूक चांगलीच रंगतदार होण्याची शक्यता आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.