Govinda Joins Shivsena : गोविंदाचा शिवसेनेत पक्षप्रवेश; लोकसभा लढवणार ?

Govinda Joins Shivsena : गोविंदाला राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची इच्छा असल्याची कृष्णा हेगडे यांनी सांगितलं होतं. उत्तर पश्चिम मुंबई म्हणजेच वायव्य मुंबई लोकसभा जागेसाठी गोविंदाच्या रूपात शिवसेनेकडून नवीन चेहरा उतरवण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

170
Govinda Joins Shivsena : गोविंदाचा शिवसेनेत पक्षप्रवेश; लोकसभा लढवणार ?
Govinda Joins Shivsena : गोविंदाचा शिवसेनेत पक्षप्रवेश; लोकसभा लढवणार ?

अभिनेता गोविंदा अहुजा (Actor Govinda) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. बुधवार, २७ मार्च रोजी रात्री अभिनेता गोविंदाने माजी आमदार आणि कृष्णा हेगडे यांची भेट घेतली होती. त्यानंतर २८ मार्च रोजी हा पक्षप्रवेश झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला असून गोविंदाला मुंबईतील वायव्य मुंबईतून (North West Mumbai Lok Sabha Election) उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा आहेत. ठाकरे गटाकडून या जागेवर अमोल कीर्तीकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (Govinda Joins Shivsena)

(हेही वाचा – Rahul Gandhi पंतप्रधान पदाचे उमेदवार? Shiv Sena UBT ची अप्रत्यक्ष कबुली)

गोविंदा शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा आहेत. गोविंदाला राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची इच्छा असल्याची कृष्णा हेगडे यांनी सांगितलं होतं. उत्तर पश्चिम मुंबई म्हणजेच वायव्य मुंबई लोकसभा जागेसाठी गोविंदाच्या रूपात शिवसेनेकडून नवीन चेहरा उतरवण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीबाबत निर्णय मुख्यमंत्री घेणार – गोविंदा

मी शिंदेसाहेबांचे आभार मानतो आणि शुभेच्छा स्वीकारतो. आजच्या दिवशी या पक्षात प्रवेश करत आहे. ही माझ्यासाठी देवाने दिलेली प्रेरणा आहे. मी राजकारणातून बाहेर पडल्यावर वाटले नव्हते की, पुन्हा या क्षेत्रात येईन. वनवासानंतर मी पुन्हा राम राज्य असलेल्या पक्षात येत आहे. मी मला दिलेली जबाबदारी इमानदारीने पार पाडेन. गेले 14-15 वर्षे मी मला आई-बाबांनी शिकवलेला मंत्र म्हणत होतो आणि अभिनय करत होतो.ही जन्मभूमी संताची आहे. या भूमीत सगळे आहे. माझ्यावर शिवकृपा राहिली. बाळासाहेब यांची देखील आमच्यावर कृपा होती.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईचे सुशोभीकरण वाढले. कामांना गती मिळाली, प्रदूषण कमी होत आहे. आता मुंबई फार सुंदर दिसत आहे. मुंबईत शिंदे साहेबांमुळे बदल दिसतोय. मी कला आणि सांस्कृतिक विभागात चांगले कार्य करीन. मी मुंबईतील फिल्म सिटी जगातली सगळ्यात भारी फिल्म सिटी करणार आहे. लोकसभा निवडणुकीबाबत निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे गोविंदा या वेळी म्हणाले.

(हेही वाचा – Supreme Court : एप्रिलमध्ये सुप्रीम कोर्टाच्या ‘या’ ४ सुनावण्यांमुळे तापू शकते राजकारण)

अमोल कीर्तीकरांना तगडी स्पर्धा ?

अभिनेता गोविंदा याने 2004 साली उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्या वेळी त्यांनी भाजपच्या राम नाईकांचा पराभव केला होता. गोविंदाची प्रसिद्धी लक्षात घेता त्याला तिकीट देऊन काँग्रेसने भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला होता. नंतरच्या काळात गोविंदाने पुन्हा एकदा अभिनयाकडे मोर्चा वळवला. आता पुन्हा एकदा त्याने राजकारणात प्रवेश केला आहे.

उबाठा गटाने वायव्य मुंबईतून अमोल कीर्तीकरांना उमेदवारी घोषित केली आहे. त्यांच्या विरोधात लढण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी लोकप्रिय चेहरा म्हणून गोविंदाला पक्षात घेतल्याची माहिती आहे. (Govinda Joins Shivsena)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.