Sharad Pawar Group : शरद पवार गटाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

223
लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar Group) या गटाची पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरुर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे यांना संधी देण्यात आली आहे. तर नुकतेच अजित पवार गटातून शरद पवार गटात (Sharad Pawar Group) आलेल्या निलेश लंके यांना अहमदनगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद उमेदवारांची नावे घोषित केली.

कोण कुठून लढणार? 

  • वर्धा – अमर काळे
  • दिंडोरी – भास्करराव भगरे
  • बारामती – सुप्रिया सुळे
  • शिरुर – डॉ. अमोल कोल्हे
  • अहमदनगर – निलेश लंके

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.