Water Shortage: जेजुरीत चार दिवसांतून फक्त एकदाच पाणी, महिलांनी काढला हंडा मोर्चा

नाझरे धरण आणि मांडकी डोहातून जेजुरी शहराला पिण्याच्या पाण्याची योजना आहे. नाझरे धरण पूर्णपणे कोरडे पडल्याने या योजनेतून जेजुरीला पाणी येणे बंद झाले आहे.

88
Water Shortage: जेजुरीत चार दिवसांतून फक्त एकदाच पाणी, महिलांनी काढला हंडा मोर्चा

जेजुरी शहराला नाझरे धरण आणि मांडकी डोहातून पिण्याच्या पाण्याची योजना आहे. नाझरे धरण पूर्णपणे कोरडे पडल्याने या योजनेतून जेजुरीला पाणी येणे बंद झाले आहे. पाणीटंचाईच्या (Water Shortage) काळात ती दुरुस्त करण्यात आली, मात्र तरीही जेजुरीला दररोज ६० लाख लिटर पाण्याची आवश्यक आहे.

चार दिवसांतून फक्त एकदाच पाणी येत आहे. त्यामुळे जेजुरीकरांना पाण्याच्या शोधात शहरात ठिकठिकाणी भटकावे लागते. जेजुरीमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.  नगरपालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याने पाणीटंचाईच्या झळा स्थानिकांना बसत असल्याची माहिती समोर आली आहे. (Water Shortage)

(हेही वाचा – Mumbai Police : लोकसभा निवडणुकीचे वेतन १० वर्षांनी पोलिसांच्या खात्यात )

नाझरे धरण आणि मांडकी डोहातून जेजुरी शहराला पिण्याच्या पाण्याची योजना आहे. नाझरे धरण पूर्णपणे कोरडे पडल्याने या योजनेतून जेजुरीला पाणी येणे बंद झाले आहे. तातडीची पाणी योजना असणाऱ्या मांडकी डोहावरील योजना गेली तीन ते चार वर्षे नादुरुस्त होती. पाणीटंचाईच्या काळात ती दुरुस्त करण्यात आली, मात्र तरीही जेजुरीला दररोज ६० लाख लिटर पाण्याची आवश्यक आहे.

पाण्यासाठी नागरिक हैराण
गेले वर्षभार ४ दिवसांआड पाणी नगरपालिकेकडून पुरविले जात होते, मात्र एका महिन्यापासून पाण्याचे वेळापत्रक कोलमडून गेल्याने पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. सध्या जेजुरी पाणीपुरवठा केंद्रापासून जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा होत नसल्याचे नगरपालिकेकडून सांगितले जात आहे.

टँकर उपलब्ध नाही
उन्हाळ्याच्या दिवसांत पाणी जास्त लागते. पाण्याची मागणी वाढल्याने टॅंकर उपलब्ध होत नाहीत. नगरपालिका प्रशासनाला नागरिक दोष देत आहेत. नियमित पिण्याचा पाणीपुरवठा न झाल्यास हंडा मोर्चा काढण्याचा इशारा महिलांनी दिला आहे तसेच मांडकी डोह योजना सुरू झाल्यानंतर २ दिवसांआड पाणी दिले जाईल, ही घोषणाही कागदावरच राहिली आहे. त्यामुळे पुढील काळात येथील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.