Congress ची स्वबळाची तयारी की कार्यकर्त्यांची फसवणूक?

91
राज्यसभेतील Congress च्या विरोधी पक्षनेतेपदाला धोका!

महाराष्ट्र काँग्रेस (Congress) पक्षाने एकीकडे स्वबळाची तयारी केल्याचे सांगत विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक कार्यकर्त्यांकडून जिल्हावार अर्ज मागवले आहेत. एका अर्जासोबत २०,००० रुपये भरण्याच्या सूचना देण्यात आल्या असून ही रक्कम परत केली जाणार नसल्याचे सांगण्यात आले. निवडणूक टिकीटाच्या नावाखाली पक्षनिधी जमवून कार्यकर्त्यांची फसवणूक करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. (Congress)

(हेही वाचा- Champions Return Home : ‘झेल नीट बसला नसता, तर तुला घरी बसवलं असतं’, – रोहितने उडवली सूर्यकुमार यादवची टर )

स्वबळाचा नारा की आघाडी?

कोंगरास प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पक्षातर्फे स्वबळाची तयारी सुरू असल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) एकत्र लढणार असल्याचेही सांगितले. एकीकडे स्वबळाचा नारा देत पक्ष कार्यकर्त्यांकडून निधी गोळा केला जात असल्याने कार्यकर्तेही बुचकळ्यात पडले आहेत. (Congress)

पक्षनिधी २०,००० रोख अथवा डीडी

काँग्रेसने (Congress) सर्व जिल्हाध्यक्षांना पत्र पाठवून विधानसभेसाठी २८८ मतदार संघातील इच्छुकांचे अर्ज मागवले आहेत. या अर्जासोबत खुल्या प्रवर्गातील इच्छूकाने २०,००० रोख अथवा डिमांड ड्राफ्ट (डीडी) पक्षनिधी म्हणून जमा करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. अर्ज पाठवण्याची मुदत १० ऑगस्टपर्यंत असून उमेदवारी मिळाली नाही तर पक्षनिधी परत मिळणार नाही. (Congress)

(हेही वाचा- Crime News: डॉक्टरांचा हलगर्जीपणा महिलेच्या जीवावर बेतला! तोंडात बोळा घालून महिलेचं निर्दयीपणे ऑपरेशन)

कार्यकर्ते संभ्रमात

सर्व मतदार संघातून अर्ज मागितल्यामुळे काँग्रेस (Congress) स्वबळाच्या दिशेने तयारी करत आहे, असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटत असतानाच दुसरीकडे महाविकास आघाडी म्हणून लढणार, असेही सांगितले जात आहे. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात असून याचा फटका पक्षाला बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. (Congress)

एससी, एसटी, महिलांना सवलत

खुल्या वर्गातील इच्छूकाने पक्षनिधी २०,००० रुपये भरायचा असून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती तसेच महिलांसाठी १०,००० रुपये पक्षनिधी भरण्याची सवलत देण्यात आली आहे. हा निधी जिल्हाध्यक्षांनी प्रदेश कार्यालयात जमा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. याबाबत पुढील रणनीती ठरवण्यासाठी पुढच्या आठवड्यात मुंबईत बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले. (Congress)

(हेही वाचा- Beed Accident : रिलच्या नादात भीषण अपघात! पाहा थराराक व्हिडिओ)

आघाडीत जागावाटपावरून रस्सीखेच

दरम्यान, काँग्रेसला (Congress) लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक जागा मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला असून महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) आता मोठा भाऊ म्हणून काँग्रेस (Congress) भूमिका बजावत आहे. तर उबाठा (UBT) आणि शरदचंद्र पवार गट (Sharad Chandra Pawar group) यांनीही प्रत्येकी ९०-१०० जागांची मागणी केल्याचे समजते. तीनही पक्षात जागावाटपावरून अंतर्गत रस्सीखेच सुरू झाल्याचे काही नेते खाजगीत सांगतात. (Congress)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.