Beed Accident : रिलच्या नादात भीषण अपघात! पाहा थराराक व्हिडिओ

291
Beed Accident : रिलच्या नादात भीषण अपघात! पाहा थराराक व्हिडिओ
Beed Accident : रिलच्या नादात भीषण अपघात! पाहा थराराक व्हिडिओ

सध्या रिल्सचा ट्रेण्ड तरुणांना खुळावत आहे. यामुळे अनेक ठिकाणी अपघाताच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत. पण हाच नाद कधीकधी जीवघेणा ठरू शकतो. असाच प्रकार बीडमधून समोर येत आहे. दुकाचीकवरून प्रवास करत असताना सेल्फी काढण्याचा प्रयत्न केल्यामुळे एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य एक जण गंभीर जखमी आहे. (Beed Accident)

सेल्फी कॅमेऱ्याच्या माध्यमातून रिल

मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवर मागे बसलेला तरूण सेल्फी कॅमेऱ्याच्या माध्यमातून रिल काढत होता. बाईक वेगात चाललेली असताना तो मागे वळून पाहून कॅमेऱ्याला बोटांनी व्हिक्टरी साईन दाखवत होता. विशेष म्हणजे बाईक चालवत असलेला तरुणदेखील रिल तयार करण्यासाठी फोनमध्ये बघण्याचा प्रयत्न करत होता. (Beed Accident)

दोघंही तरुण जालन्याचे रहिवासी

याचवेळी एका क्षणात त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपासवर घडली आहे. अपघात होतानाची दृश्ये या दोन तरुणांनी घेतलेल्या सेल्फी व्हिडीओत कैद झाली आहेत. दोघंही तरुण जालन्याचे रहिवासी आहेत. यातील मृत तरुणाचे नाव अनिरुध कळकांबे असून तो जालना जिल्ह्यातील गणेश पूरमधील रहिवाशी आहे. (Beed Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.