Champions Trophy 2025 : पाकिस्तानने वेळापत्रक जाहीर केलं असलं, तरी भारतीय सहभागाविषयी अनिश्चितता कायम

भारतीय संघाने २००८ पासून पाकिस्तानचा दौरा केलेला नाही.

113
Champions Trophy 2025 : पाकिस्तानने वेळापत्रक जाहीर केलं असलं, तरी भारतीय सहभागाविषयी अनिश्चितता कायम
Champions Trophy 2025 : पाकिस्तानने वेळापत्रक जाहीर केलं असलं, तरी भारतीय सहभागाविषयी अनिश्चितता कायम
  • ऋजुता लुकतुके

२०२५ सालची चॅम्पियन्स करंडक स्पर्धा (Champions Trophy 2025) पाकिस्तानमध्ये होणं प्रस्तावित आहे. आणि ती ठरल्याप्रमाणे पार पडावी यासाठी पाकिस्तानचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीला संभाव्य वेळापत्रकही सादर केलं आहे. यात भारतीय संघाचे सामनेही आहेत. पण, भारताने अजूनही संघाच्या दौऱ्याला मान्यता दिलेली नाही. भारतात पाकिस्तानचा दौरा करायचा असेल तर केंद्रसरकार आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची परवानगी लागते. अद्याप ती मिळालेली नाही.

गेल्यावर्षी आशिया चषकाच्या वेळी अशी परवानगी मिळाली नव्हती. त्यामुळे भारताचे सामने श्रीलंकेत म्हणजे त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात आले. यावेळी मात्र पाकिस्तानला अख्खी स्पर्घा पाकिस्तानमध्ये झालेली हवी आहे. त्यासाठी ते आयसीसीकडे जोरदार प्रयत्न करत आहेत. आणि भारताला तसंच इतर संघांनाही त्यांनी सुरक्षेची पूर्ण हमी दिली आहे. असं असलं तरी भारतीय संघाच्या समावेशाबद्दल अजूनही अनिश्चितता कायम आहे. (Champions Trophy 2025)

(हेही वाचा – Champions Return Home : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रोहित, विराटशी काय गप्पा मारल्या)

बुधवारी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बुधवारी स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. आणि भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना १ मार्चला लाहोर इथं आयोजित केला आहे. ही स्पर्धा १९ फेब्रुवारी ते ९ मार्च दरम्यान पाकिस्तानमध्ये व्हायची आहे. पाकिस्तानने शुक्रवारी देशात होणाऱ्या क्रिकेट मालिकांचे कार्यक्रम जाहीर केले आहेत. आणि यात बांगलादेश, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडचे संघ या आणि पुढील वर्षी पाकिस्तानचा दौरा करणार असल्याचं दिसतंय.

या दौऱ्यांच्या यशस्वी आयोजनातून चॅम्पियन्स करंडकासाठी आपली दावेदारी पाकिस्तानला मजबूत करायची आहे. आणि भारतावर दडपणही वाढवायचं आहे.

पाकिस्तानमध्ये श्रीलंकन क्रिकेट संघ असताना झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. उभय देशांमध्ये सीमेवरून असलेल्या वादांमुळे केंद्रसरकारच्या किंवा परराष्ट्र व्यवहार खात्याच्या परवानगीशिवाय भारतीय नागरिकांना पाकिस्तानला जाताही येत नाही. (Champions Trophy 2025)

(हेही वाचा – Crime News: डॉक्टरांचा हलगर्जीपणा महिलेच्या जीवावर बेतला! तोंडात बोळा घालून महिलेचं निर्दयीपणे ऑपरेशन)

त्यामुळे बीसीसीआयने अजूनही चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (Champions Trophy 2025) भारत सहभागी होणार का यावर स्पष्टता दिलेली नाही. २०२३ च्या आशिया चषकाचं आयोजन पाकिस्तानमध्ये झालं होतं. पण, भारताने खेळायला नकार दिल्यावर भारताचे सामने श्रींलकेत झाले. यावेळी मात्र पाकिस्तानने देशाबाहेर सामने हलवायला नकार दिला आहे. आणि भारताला खेळण्यास भाग पाडावं यासाठी आयसीसीला गळ घातली आहे.

पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय सामने आयोजित होत नसल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं उत्पन्न कमालीचं घटलं आहे. आणि आर्थिक स्थितीला उभारी आणण्यासाठी त्यांना स्पर्धा आयोजनाची गरज आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.