Hamas Israel War थांबण्याच्या वाटेवर? कुणी केली मध्यस्थी?

118

जग सध्या दोन युद्धांनी त्रस्त केले आहे. रशिया आणि युक्रेन आणि हमास आणि इस्रायल (Hamas Israel War). या दोन युद्धांनी जग महागाईच्या उंबरठ्यावर आले आहे. त्यामुळे ही युद्धे बंद व्हावीत, यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. अखेर यातील एक युद्ध बंद करण्यात यश मिळाले आहे. हमास- इस्रायल युद्धाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता बळावली आहे.
गेल्या वर्षी रात्रीच्यावेळी हमासने इस्त्रायलच्या आकाशात हजारो क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता. यामुळे खवळलेल्या इस्रायलने गाझामध्ये असलेल्या हमास या दहशतवादी संघटनेवर प्रतिहल्ला सुरु केला होता. (Hamas Israel War) इस्त्रायलने जवळपास गाझा हमासच्या ताब्यातून काढून घेत शहरही उदध्वस्त केले आहे. अशातच मेटाकुटीला आलेल्या हमासने इस्रायलच्या बांधकामांना बंधकांना मारण्यास सुरुवात केली होती. यामुळे हे युद्ध आणखी भडकण्याची चिन्हे होती. अमेरिकेसह मुस्लिम देशांनी या दोघांमध्ये युद्धबंदी करण्यासाठी प्रयत्न चालविले होते. त्याला आता यश येऊ लागले आहे. हमासने बंधकांना सोडण्यावर आणि इस्रायलने युद्धविरामावर सहमती दर्शविली आहे.

(हेही वाचा Indian Armyच्या ताफ्यात अत्याधुनिक दर्जाच्या एके – २०३ रायफल्सची काय आहेत वैशिष्ट्ये? जाणून घ्या…)

हमासने याची शनिवारी घोषणा केली. सर्व इस्रायली सैनिक आणि ओलीस ठेवलेल्या नागरिकांना सोडण्यात येणार आहे, असे हमासने म्हटले आहे. जेरुसलेम पोस्टच्या वृत्तानुसार पहिल्या टप्प्यात तात्पुरता युद्धविराम (Hamas Israel War), मदत वितरण आणि इस्रायली सैन्य मागे घेण्याबाबत सहमती झालेली आहे. यानंतरच्या टप्पा लागू करण्यासाठी अप्रत्यक्ष चर्चा सुरु ठेवल्या जाणार आहेत. इस्त्रायलच्या टीमनेही आता करार होण्याची शक्यता अधिक असल्याचे म्हटले आहे. यासाठी वॉशिंग्टन, इस्रायल आणि कतर यांच्यात सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी करार करण्यासाठी अमेरिकन प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.