Sanjay Shirsat : अब्रुनुकसान दाव्याप्रकरणी आमदार संजय शिरसाट यांना समन्स

दरम्यान काही दिवसांपूर्वीच शिरसाट (Sanjay Shirsat) यांना छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून मोठा दिलासा मिळाला होता.

95
Sanjay Shirsat : अब्रुनुकसान दाव्याप्रकरणी आमदार संजय शिरसाट यांना समन्स

अब्रुनुकसानीच्या दाव्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या दिवाणी न्यायाधीशांनी समन्स बजावले आहे. त्यानुसार 13 जुलै रोजी सकाळी 11 वाजता संजय शिरसाट यांना न्यायालयात हजर राहून दाव्याला उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

(हेही वाचा – Mira Road Murder : माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर : लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे मिक्सरमध्ये केले बारिक)

काय आहे प्रकरण?

आमदार शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर केलेल्या टिप्पणीनंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी सुषमा अंधारे यांनी पुणे पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला नाही. त्यानंतर शिरसाट यांनी केलेल्या कथित वक्तव्याबाबत सुषमा अंधारे यांनी त्यांना मानहानीबाबत नोटीस बजावली होती. त्यामध्ये, त्यांनी सात दिवसात खुलासा करण्याची मागणी केली होती. परंतु त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न आल्याने अंधारे यांनी शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयात दिवाणी व फौजदारी स्वरुपाचा दावा दाखल केला होता. दिवाणी दाव्यात त्यांनी तीन रुपयांची नुकसान भरपाई मिळावी, यासाठी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. त्यानंतर आता न्यायालयाने शिरसाट (Sanjay Shirsat) यांना समन्स बजावले आहे.

हेही पहा – 

छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून शिरसाट यांना दिलासा

दरम्यान काही दिवसांपूर्वीच शिरसाट (Sanjay Shirsat) यांना छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून मोठा दिलासा मिळाला होता. अंधारे यांच्याविरुद्ध विनयभंग करणारे वक्तव्य केल्या प्रकरणाच्या आरोपात शिरसाट यांना पोलिसांकडून क्लीन चीट देण्यात आली. पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडून करण्यात आलेल्या चौकशीनंतर त्यांना ही क्लीन चीट मिळाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.