Mira Road Murder : माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर : लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे मिक्सरमध्ये केले बारिक

दरम्यान, महिलेचा खून हा दोन ते तीन दिवसांपूर्वी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

172
Mira Road Murder : माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर : लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे मिक्सरमध्ये केले बारिक

सध्या राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढतांना दिसत आहे. विशेषतः हत्येच्या (Mira Road Murder) प्रकरणात वाढ झाली आहे. अशातच मिळालेल्या माहितीनुसार मिरा रोड येथे एक हत्या झाली आहे. प्रियकरानेच आपल्या प्रियसीची हत्या केली आहे.

प्रियकराने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या आपल्या पार्टनरची निघृण हत्या (Mira Road Murder) करुन तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करुन त्याची विल्हेवाट लावली आहे. मृतदेहाचे तुकडे करून आरोपी ते तुकडे प्रेशर कुकरमध्ये टाकायचा, ते उकडवायचा आणि मग मिक्सरमध्ये बारीक करायचा. त्यानंतर हे तुकडे तो पिशवीत भरून त्यांच्या इमारतीच्या मागे असलेल्या गटारात फेकून द्यायचा. यासाठी तो त्याच्या बाईकचा वापर करायचा. गुन्ह्यासाठी वापरलेलं हे सगळं सामान आणि बाईक काल म्हणजेच बुधवार ७ जून रोजी रात्री पोलिसांनी जप्त केलं आहे.

(हेही वाचा – Mosque : इस्लामी राष्ट्र इराणमधील 50 हजार मशिदी झाल्या बंद)

माहितीनुसार, ही हत्या (Mira Road Murder) का करण्यात आली याची माहिती चौकशीनंतर समोर येईल. दरम्यान, महिलेचा खून हा दोन ते तीन दिवसांपूर्वी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. शेजाऱ्यांनी दुर्गंधी येत असल्याची तक्रार केली. त्या नंतर पोलिसांकडून हा फ्लॅट उघडला आणि त्यानंतर जे चित्र समोर आलं ते पाहुन सर्वांनाच धक्का बसला आहे. सध्या स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

सध्या आरोपीला पोलिसांनी अटक करुन, घरातील हत्येसाठी (Mira Road Murder) वापरण्यात आलेले सर्व साहित्य जप्त केले आहेत. मनोज साने असं या 56 वर्षांच्या आरोपीचं नाव आहे, तर सरस्वती वैद्य असं मृत महिलेचं नाव आहे. ती 32 वर्षांची होती. मीरा भाईंदर उड्डाणपूलाच्या शेजारी गीता आकाशदीप नावाची सोसायटी आहे. तिथला हा सगळा प्रकार आहे. पोलिसांनी सानेला अटक केली आहे. हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचे गुन्हे त्याच्यावर दाखल करण्यात आले आहेत.

हेही पहा – 

मागच्या तीन वर्षांपासून हे जोडपं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होतं. याप्रकरणी आरोपीवर खुनाचा गुन्हा (Mira Road Murder) दाखल करण्याची नयानगर पोलीस ठाण्यात प्रक्रिया सुरू आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पंखा आणि प्रेशर कुकरचा वापर केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.