Mosque : इस्लामी राष्ट्र इराणमधील 50 हजार मशिदी झाल्या बंद

209

इराणमध्ये झालेल्या महिल्यांच्या हिजाब विरोधी आंदोलनाने पूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते. एका मौलवीने असा दावा केला आहे की, देशाच्या 75 हजार पैकी 50 हजार मशिदी बंद झाल्या आहेत. इराणमध्ये हिजाब आणि बुरख्याच्या विरोधात लाखो महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. आता मौलाना मोहम्मद अबोलघासीम दौलाबीने देशातल्या मशिदी बंद होण्याच्या मार्गावर असल्याची चिंता व्यक्त केली आहे. इराणसारख्या इस्लामी राष्ट्रात मशिदींना टाळे ठोकले जात आहे, याविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे.

ज्या मौलवींनी ही बातमी दिली, तो इराणच्या इब्राहिम रईसी सरकार आणि देशातल्या मौलवींच्या दरम्यान एक दुवा म्हणून काम करतो. त्यांनी गुरुवारी 1 जून रोजी म्हटले की, नमाज पठण करणाऱ्या लोकांची संख्यादेखील कमी होताना दिसत आहे. ते म्हणाले, या देशाची निर्मिती ही इस्लामच्या आजूबाजुला झाला आहे, यातच त्याच्यासाठी नमाज पठण करणारे आणि मशिदीचे सदस्यत्व घेणाऱ्यांची संख्या कमी होत आहे ही सर्वात मोठी चिंतेची बाब आहे.

(हेही वाचा Game Jihad : गेम जिहादमधून मुंब्रा येथे 400 हिंदूंचे धर्मांतर )

दौलाबी हे विशेषतज्ज्ञ समितीचे सदस्य आहेत. ही समिती इराणच्या सुप्रीम लीडरची निवड करते. इराणी समाजात धर्माबद्दलची आस्था कमी झाल्यामुळे मशिदी बंद केल्या जात आहेत, असे ते म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.