Diva City : ‘दिवा’ शहरावरचा अनधिकृत शिक्का पुसणार

ठाणे महानगर पालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या दिवा शहरातील (Diva City) सुमारे 610 कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला.

239
Diva City : 'दिवा' शहरावरचा अनधिकृत शिक्का पुसणार

दिवा (Diva City) शहर हे सुनियोजित शहर म्हणून विकसित करण्यासाठी ठाण्याप्रमाणेच दिव्यातही समूह विकास योजना (क्लस्टर) राबविण्यात येईल, अशी घोषणा करून यासाठीची प्रक्रिया राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (७ जून) महापालिका आयुक्तांना दिले. त्यामुळे ‘दिवा’ शहरावरचा अनधिकृत हा शिक्का आता पुसला जाणार आहे.

ठाणे महानगर पालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या दिवा शहरातील (Diva City) सुमारे 610 कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, दिवा शहराच्या विकासाचा शब्द दिला होता. मोठ्या प्रमाणात निधी देऊन तो शब्द पाळत आहे. यापुढील काळातही दिवा शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येईल.

(हेही वाचा – WTC Final 2023 : पहिल्या दिवसाच्या खेळीवर इरफान पठानची भारतीय गोलंदाजांवर बोचरी टीका; म्हणाला …)

आतापर्यंत या शहरात (Diva City) पाणीपुरवठ्यासाठी 240 कोटी, दिव्यातील रस्त्यांसाठी 132 कोटी, दिवा-आगासन रस्त्यासाठी 63 कोटी, आगरी कोळी वारकरी भवनसाठी 15 कोटी, देसाई खाडीपूलसाठी 67 कोटी, आगासन येथे 100 खाटांच्या रुग्णालयासाठी 58 कोटी, खिडकारी, दातिवली, देसाई तलावच्या सुशोभिकरणासाठी 22 कोटी व खिडकाळेश्वर मंदिराच्या विकासासाठी 13.5 असे एकूण 610 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यापुढील काळातही आणखी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येईल.

दिवा (Diva City) रेल्वे स्थानकाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पंतप्रधान आणि रेल्वे मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल. बेतवडे येथे प्रधानंत्री आवास योजनेतील 2800 घरांचा प्रकल्प उभा राहत आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या धर्तीवर राज्यात नमो आवास योजनेतून 10 लाख घरे बांधण्यात येणार आहेत. हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. नागरिकांच्या सुविधांसाठी निधी देण्यात हात आखडता घेणार नाही, असेही शिंदे यांनी सांगितले.

कोकण रेल्वे दिव्याला थांबणार

– खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, दिवा शहराच्या (Diva City) विकासासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आतापर्यंत हजार कोटींपेक्षा जास्त निधी देण्यात आला आहे. दिवा स्थानकामध्ये कोकणात जाणाऱ्या रेल्वेला थांबा मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

– या रेल्वे थांबविण्यासाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवावी लागणार असून त्यासाठी जेवढा निधी लागेल तेवढा देण्यात येईल. तसेच दिव्यात 150 बेडचे सुसज्ज रुग्णालयासाठीची जागा राज्य सरकारकडून मिळाली असून त्याच्या भूसंपादनासाठी 68 कोटी निधी मंजूर झाला आहे.

– दिवा शहरात स्वतंत्र पोलिस ठाणे असावे तसेच ठाण्याप्रमाणे येथेही क्लस्टर योजना राबवावी, अशी मागणीही खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी केली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.