WTC Final 2023 : पहिल्या दिवसाच्या खेळीवर इरफान पठानची भारतीय गोलंदाजांवर बोचरी टीका; म्हणाला …

सामन्याच्या सुरुवातीला भारताचा दबदबा होता. मात्र पहिल्या सेशन्सनंतर ऑस्ट्रेलियाची पकड दिसून आली.

203
WTC Final 2023 : पहिल्या दिवसाच्या खेळीवर इरफान पठानची भारतीय गोलंदाजांवर बोचरी टीका; म्हणाला ...

इंग्लंडमधील द ओव्हल मैदनावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बुधवार ७ जून पासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC Final 2023) अंतिम सामना सुरु झाला आहे. या सामन्यातील पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच वर्चस्व दिसून आलं. सामन्याच्या सुरुवातीला भारताचा दबदबा होता. मात्र पहिल्या सेशन्सनंतर ऑस्ट्रेलियाची पकड दिसून आली. पहिल्या सेशनमध्ये उत्तम कामगिरी करणारे भारतीय बॉलर्स नंतरच्या दोन सेशनमध्ये बॅकफूटवर गेले. पहिल्या सेशनमध्ये भारताला ३ विकेट्स मिळाल्या मात्र नंतर भारतीय गोलंदाजांकडून निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली.

या सर्व परिस्थितीवर भारताचा माजी गोलंदाज इरफान पठान (Irfan Pathan) याने टीका केली आहे. एक ट्विट करत त्याने भारतीय गोलंदाजांवर अप्रत्यक्ष टीका केली आहे.

(हेही वाचा – WTC Final 2023 : भारतीय संघ दहा वर्षांपूर्वीचा इतिहास बदलण्यासाठी उत्सुक)

नेमकं काय म्हणाला इरफान?

टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठानने आपल्या टि्वटमध्ये आयपीएलचा अप्रत्यक्षपणे उल्लेख करत टीका केली आहे. “४ ओव्हर गोलंदाजी केल्यानंतर थेट १५-२० ओव्हर गोलंदाजी करणं एक मोठी झेप असते” असं इरफानने त्याच्या टि्वटमध्ये म्हंटल आहे. इरफानने खूप मोजक्या शब्दात टि्वट करत गोलंदाजांवर बोचरी टीका केली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final 2023) पहिल्या दिवसाच्या खेळात मोहम्मद शमीने 20 ओव्हर्समध्ये 77 धावा देऊन 1 विकेट घेतली. मोहम्मद सिराजने 19 ओव्हर्समध्ये 67 धावा देऊन 1 विकेट मिळवली, शार्दुल ठाकूरने 18 ओव्हरमध्ये 75 रन्स देऊन 1 विकेट तर रवींद्र जाडेजाने 14 ओव्हरमध्ये 48 धावा देऊन एकही विकेट मिळवण्यात यश आले नाही.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाचा अखेर ३२७ धावा आणि ३ विकेट्सवर केला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.