WTC Final 2023 : भारतीय संघ दहा वर्षांपूर्वीचा इतिहास बदलण्यासाठी उत्सुक

२०१३ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा पराभव करत भारताने ही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.

245
WTC Final 2023 : भारतीय संघ दहा वर्षांपूर्वीचा इतिहास बदलण्यासाठी उत्सुक

इंग्लंडमधील द ओव्हल मैदनावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज म्हणजेच बुधवार ७ जून पासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC Final 2023) अंतिम सामना सुरु होणार आहे. भारताने २०१३ रोजी धोनीच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली होती. त्यामुळेच तब्बल दहा वर्षांनी पुन्हा एकदा या चॅम्पियनशिपवर भारत आपलं नाव कोरण्यासाठी सज्ज झाला आहे. २०१३ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा पराभव करत भारताने ही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.

त्यानंतर भारताचा ३ वेळा फायनलमध्ये (WTC Final 2023) पराभव झाला आहे. तर चार वेळा भारतीय संघ सेमीफायनलमध्ये पराभूत झाला आहे. भारताने २०२१ साली टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल मॅच खेळली होती, तेव्हा न्यूझीलंडकडून भारताचा पराभव झाला होता. त्यामुळे आता भारतीय संघ दहा वर्षांपूर्वीचा इतिहास बदलण्यासाठी उत्सुक आहे.

(हेही वाचा – Test Cricket Ranking 2023 : भारताचे कसोटी मालिकेत वर्चस्व)

फायनल ड्रॉ झाली तर…

अंतिम लढत जर ड्रॉ झाली किंवा टाय झाली तर दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद दिले जाईल. तसेच (WTC Final 2023) फायनलसाठी एक दिवस राखीव ठेवला आहे. कसोटी मॅच पाच दिवसांची असते पण जर या काळात निकाल लागला नाही किंवा पावसामुळे काही अडचण आली तर राखीव दिवशी मॅच होईल.

या लढतीतील (WTC Final 2023) विजेत्या संघाला ट्रॉफीसह १६ लाख डॉलरचे बक्षिस मिळणार आहे. उपविजेत्या संघाला ८ लाख डॉलरचे बक्षिस दिले जाईल. जर मॅच ड्रॉ झाली तर विजेता आणि उपविजेत्याची रक्कम एकत्र करून दोन्ही संघांनी समान वाटली जाईल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.