Monsoon : पुढील २४ तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार

केरळमध्ये मान्सून सुरु होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे पुढील २४ तासांत केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

90
Monsoon : पुढील २४ तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार

लवकरच मान्सूनची (Monsoon) प्रतीक्षा संपणार आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ‘बिपोरजॉय’ (Biporjoy Cyclone) नावाचं चक्रीवादळ निर्माण झालं आहे. त्यामुळे याचा परिणाम मान्सूनवर होत आहे. असं असलं तरी भारतीय हवामान विभागाने एक आनंदची बातमी दिली आहे.

त्या बातमीनुसार, आता मान्सूनची (Monsoon) प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. त्यामुळे उकाड्यापासूनही लवकरच दिलासा मिळणार आहे. केरळमध्ये उद्या म्हणजेच शुक्रवार ९ जून रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता, हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाच्या वरिष्ठ अधिकारऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये मान्सून सुरु होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे पुढील २४ तासांत केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – Kolhapur Bandh : तणावपूर्ण शांतता; मात्र इंटरनेट सेवा बंदच)

केरळमध्ये मान्सून सुरू होण्यासाठी अनुकूल परिस्थिती

एकीकडे ‘बिपोरजॉय’ चक्रीवादळ तीव्र होत असतानाच भारतीय हवामान विभागाने (IMD) अंदाज वर्तवला आहे की, केरळमध्ये मान्सून (Monsoon) सुरू होण्यासाठी सर्व परिस्थिती अनुकूल आहे. यामुळे ९ जूनपासून केरळमध्ये मान्सून हजेरी लावण्याची शक्यता आहे. साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी केरळमध्ये पाऊस दाखल होत असतो. पण यंदा पाऊस लांबला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) एका वरिष्ठ शास्त्रज्ञानं याबाबत माहिती देत सांगितलं आहे की, केरळमध्ये मान्सून (Monsoon) सुरू झाल्यानंतर, १२ जूनच्या सुमारास बिपरजॉय चक्रीवादळ क्षीण होईपर्यंत पाऊस कमी प्रमाणात होईल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.