‘सागर परिक्रमा’…. अनोखा उपक्रम

188
'सागर परिक्रमा'.... अनोखा उपक्रम
'सागर परिक्रमा'.... अनोखा उपक्रम

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धोत्पादन मंत्री परशोत्तम रुपाला यांनी ‘सागर परिक्रमा’ हा आगळा-वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत ते पूर्वनियोजित सागरी मार्गाने संपूर्ण देशाच्या किनारपट्टी भागाला भेट देऊन, तिथले मच्छीमार, मत्स्यपालक आणि विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधतात.

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, केरळचे मत्स्यव्यवसाय मंत्री साजी चेरियन, यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागातील वरिष्ठ अधिकारी, लक्षद्वीपचे केंद्रशासित प्रदेश प्रशासन, राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळ, भारतीय तटरक्षक दल, भारतीय मत्स्य सर्वेक्षण आणि मच्छिमार प्रतिनिधी, ८ ते १२ जून २०२३ दरम्यान केरळ आणि लक्षद्वीपच्या केंद्रशासित प्रदेशात सागर परिक्रमा कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

(हेही वाचा – Sanjay Shirsat : अब्रुनुकसान दाव्याप्रकरणी आमदार संजय शिरसाट यांना समन्स)

देशाच्या मत्स्यव्यवसाय विभागामध्ये सुधारणा घडवून, मच्छीमार आणि या व्यवसायाशी संबंधित भागधारकांना त्याचा लाभ मिळावा, यासाठी या संवादाच्या माध्यमातून त्यांच्या समस्या आणि सूचना जाणून घेणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. ५ मार्च २०२२ रोजी मांडवी, गुजरात येथून “सागर परिक्रमा” उपक्रमाचा पहिला टप्पा सुरु झाला. सागर परिक्रमाच्या सहा टप्प्यांमध्ये आतापर्यंत गुजरात, दमण आणि दीव, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि अंदमान आणि निकोबारच्या किनारी भागांना भेट देण्यात आली. सागर परिक्रमा टप्पा-VII मध्ये केरळच्या किनारपट्टीचा भाग आणि लक्षद्वीपच्या केंद्रशासित प्रदेश प्रशासनाचा समावेश असेल. यावेळी मंगलोर, कासरगोडे, मडक्कारा, पल्लिकारा, चालियम, कन्हंगाडू, कोईकोड, माहे (पुडुचेरी), बेपोर, त्रिचूर, एर्नाकुलम, कोची आणि कावरत्ती, बंगारामंद अगट्टी ही लक्षद्वीप बेटे, इत्यादी ठिकाणांना भेट दिली जाईल.

केरळला ५९० किमी.चा समृद्ध समुद्रकिनारा लाभला आहे आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्र राज्याच्या अर्थव्यवस्थेत तसेच इथले मच्छीमार आणि इतर भागधारकांच्या सामाजिक-आर्थिक कल्याणात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

तर, लक्षद्वीपला ४,२०० चौ. किमीचा समुद्र, २०,००० चौ. किमीचे प्रादेशिक पाणी, ४,००,००० लाख चौ. किमीचे विशेष आर्थिक क्षेत्र (EEZ) आणि सुमारे १३२ किमीची किनारपट्टी लाभली आहे. लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशाभोवतीचा समुद्र हा विशेषत: ट्यूना माशांसारख्या पेलाजिक मत्स्यसंपत्तीने (समूहाने राहणारे मासे) समृद्ध आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.