Sanjay Raut: महाविकास आघाडीचे ४८ जागांवर एकमत, संजय राऊत यांचा दावा

153
Sanjay Raut: महाविकास आघाडीचे ४८ जागांवर एकमत, संजय राऊत यांचा दावा
Sanjay Raut: महाविकास आघाडीचे ४८ जागांवर एकमत, संजय राऊत यांचा दावा

राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांवर महाविकास आघाडीचे एकमत झाले आहे. कोणता पक्ष कोणती जगा लढविणार याचा मसुदा तयार झाला असून बुधवारी होणाऱ्या बैठकीत जागावाटप अंतिम केले जाईल. शरद पवार, उद्धव ठाकरे तसेच काँग्रेस आणि वंचितच्या नेत्यांच्या पत्रकार परिषदेत जागावाटप घोषित केले जाईल, असा दावा मंगळवारी शिवसेनेचे (उबाठा) प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केला आहे.

राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांवर महाविकास आघाडीचे एकमत झाले आहे. कोणता पक्ष कोणती जगा लढविणार याचा मसुदा तयार झाला असून उद्या होणाऱ्या बैठकीत जागावाटप अंतिम केले जाईल. शरद पवार, उद्धव ठाकरे तसेच काँग्रेस आणि वंचितच्या नेत्यांच्या पत्रकार परिषदेत जागावाटप घोषित केले जाईल, असे राऊत यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाची चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची मंगळवारी बैठक पार पडली. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या बैठकीनंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना संजय राऊत यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीत लोकसभेच्या ४८ जागांवर एकमत झाल्याची माहिती दिली. आघाडीच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत जागावाटप अंतिम करून लवकरच त्याची घोषणा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

तर राज्यातील निवडणूक सर्वेक्षण आघाडीसाठी अनुकूल असून लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीचा पराभव होईल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केला. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण, वर्षा गायकवाड आदी उपस्थित होते.

(हेही वाचा – Veer Savarkar : वीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त संभाजीनगर येथे स्वराविष्कार कार्यक्रम )

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.