Pune Porsche Accident प्रकरणात २ डॉक्टरांसहित एक वॉर्डबॉय निलंबित!

123
Pune Porsche Accident प्रकरणात २ डॉक्टरांसहित एक वॉर्डबॉय निलंबित!
Pune Porsche Accident प्रकरणात २ डॉक्टरांसहित एक वॉर्डबॉय निलंबित!

पुण्यातील कल्याणीनगर येथील हिट अँड रन प्रकरणात (Pune Porsche Accident) दिवसेंदिवस तापू लागलं असून याप्रकरणी आता आणखी एक नवे अपडेट समोर आले आहे. या अपघाताला जबाबदार ठरलेल्या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी त्याचे ब्लड सँपल बदलण्यात आलं होतं, त्यामुळे एकच गदारोळ माजला. खुद्द पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनीपुणे पोर्श अपघात प्रकरणात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. या अपघात प्रकरणात ब्लड सँपल बदलल्या प्रकरणी अखेर दोन डॉक्टर आणि एका वॉर्डबॉयला घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. (Pune Porsche Accident)

(हेही वाचा –Pune Porsche Car Accident घटना पुन्हा घडवणार; डिजिटल पुराव्यांसाठी ‘एआय’चा वापर)

तिघांनाही निलंबित करण्यात आले आहे. आता या प्रकरणातील (Pune Porsche Accident) तिनही आरोपींचे निलंबन झाल्याचे खुद्द ससूनचे डीन डॉ. विनायक काळे (Dr. Vinayak Kale) यांनी जाहीर केलं. डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर आणि अतुल घटकांबळे या तिघांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अल्पवयनी आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार झाल्याचे समोर आल्यानंतर याप्रकरणी चौकशी समितीने कडून तपास करण्यात आला होता. त्यानंतर आज (२९ मे) हा निर्णय जाहीर केला. (Pune Porsche Accident)

(हेही वाचा –Delhi Weather: राजधानी दिल्ली उष्णतेने होरपळली! ५० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद)

डॉ. अजय तावरे यांच्याकडे असणार कार्यभार आम्ही काढून घेतला आहे. तर डॉ. श्रीहरी हळनोर यांना बडतर्फ केले आहे. ससून रुग्णालयासाठी ही बाब अत्यंत वाईट आहे. अशा पद्धतीने ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार करणे चुकीचे आहे. यासंदर्भात पोलिसांनी जी माहिती मागितली आहे ती त्यांना देण्यात आली आहे. माझ्याकडूनही विभागीय आयुक्त आणि आमच्या वरिष्ठांनी माहिती मागितली आहे, असे ससूनचे डीन डॉ. विनायक काळे यांनी नमूद केले. (Pune Porsche Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.