Manoj Jarange: अनवधानाने ते झालं असेल… मी माझे शब्द मागे घेतो; जरांगेंनी मागितली देवेंद्र फडणवीसांची माफी

मंगळवारी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठा आंदोलनाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी मनोज जरांगेंनी केलेले हिंसक वक्तव्य आणि सतत केलेल्या आरोपांमुळे त्यांची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

534
Manoj Jarange: अनवधानाने ते झालं असेल... मी माझे शब्द मागे घेतो; जरांगेंनी मागितली देवेंद्र फडणवीसांची माफी
Manoj Jarange: अनवधानाने ते झालं असेल... मी माझे शब्द मागे घेतो; जरांगेंनी मागितली देवेंद्र फडणवीसांची माफी

मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माफी मागितली आहे. गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगेंकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सातत्याने टीका करण्यात येत आहे. दरम्यान, आता आई-बहिणीविषयी अपशब्द वापरल्याबद्दल जरांगेंनी त्यांची माफी मागितली आहे.

जरांगे म्हणाले की, ‘हे १७ दिवसांच उपोषण होतं आणि अनवधानाने ते झालं असेल. मी माझे शब्द मागे घेतो. माझ्या पोटात १७-१८ दिवसांपासून अन्न नव्हतं त्यामुळे चिडचिडेपणामुळे अनवधानाने ते शब्द गेले असतील. आई-बहिणीविषयी माझ्या तोंडून काही शब्द गेले असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो, पण सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय आणि ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय मी मागे हटणार नाही,’ असे ते म्हणाले.

(हेही वाचा – Budget Session 2024: अर्थसंकल्पातून महिला सक्षमीकरणाचा नारा, प्रत्येक जिल्ह्यात १ लाख महिलांना मिळणार शासकीय योजनेचा लाभ)

तसेच मनोज जरांगे आणि मराठा आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मंगळवारी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठा आंदोलनाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी मनोज जरांगेंनी केलेले हिंसक वक्तव्य आणि सतत केलेल्या आरोपांमुळे त्यांची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.