Samruddhi Mahamarg Accident : मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत

सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळी भेट दिली

97
Samruddhi Mahamarg Accident : मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत

शहापूर सरलांबे येथे समृध्दी महामार्गावर मध्यरात्री क्रेन कोसळून झालेल्या अपघातावर (Samruddhi Mahamarg Accident) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला असून मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणाही त्यांनी केली असून जखमींवर तातडीने शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत.

आज (१ ऑगस्ट) मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या कार्यक्रमानिमित्त पुणे येथे असून अपघाताचे वृत्त समजताच त्यांनी जिल्हा प्रशासन तसेच संबंधित अधिकारी यांच्याशी बोलून दुर्घटनेविषयी (Samruddhi Mahamarg Accident) जाणून घेतले. हा अपघात अतिशय दुर्दैवी असून त्याची सखोल चौकशी करण्यासही त्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांच्याशी बोलून त्यांना तातडीने दुर्घटनास्थळी रवानाही केले. एन डी आर एफ चे पथक याठिकाणी पोहचले असून योग्य रीतीने बचाव कार्य करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पावसाळा असल्याने अधिक खबरदारी घेण्यासही त्यांनी सांगितले आहे. समृध्दी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना हा अपघात घडला.

(हेही वाचा – LPG Gas Cylinder : महिन्याच्या पहिल्याच दिवशी आनंदवार्ता; व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती घसरल्या)

अपघाताची चौकशी केली जाईल

दरम्यान, राज्याचे रस्ते विकास सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळी (Samruddhi Mahamarg Accident) भेट दिली. गर्डर मशिनखाली दाबले गेलेल्या कामगारांना बाहेर काढण्यास प्रथम प्राधान्य देत आहोत. ही दुर्घटना कशी झाली याची चौकशी केली जाईल. तसेच मतृांच्या कुटुंबीयांना मदत देखील केली जाईल असे दादा भुसे यांनी यावेळी सांगितले.

समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg Accident) तिसऱ्या टप्प्याचे काम सरु आहे. काल म्हणजेच सोमवार ३१ जुलै रोजी रात्रीही समृद्धी महामार्गाचे असेच काम सुरु होते, मात्र त्यावेळीच ही दुर्देवी घटना घडली आहे. शाहपूर सरलांबे येथे ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन मजूरांच्या अंगावर कोसळला. यामध्ये आतापर्यंत १७ मजुरांचा मृत्यू झाला आहे. हे मृतदेह शाहपूर उप जिल्हा रुग्णालयात आणले आहेत. यामध्ये तीन ते चार जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.