Raj Thackeray : मनसे महायुतीत सहभागी होण्याच्या चर्चांवर राज ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले …

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचे नेते आहेत. मागच्या काळात त्यांचे आणि आमच्या पक्षाचे अनेक मुद्द्यावर एकमत झाले आहे. त्यांनी कट्टर प्रांतवादाची भूमिका सोडली आणि हिंदुत्वाची व्यापक भूमिका घेतली तर ते नक्कीच आमच्यासोबत असतील, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्यांकडून येत आहे.

343
Raj Thackeray : मनसे महायुतीत सहभागी होण्याच्या चर्चांवर राज ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले ...

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) दिल्लीला रवाना झाले आहेत. चार दिवसांत त्यांचा हा दुसरा दिल्ली दौरा आहे. (Lok Sabha Election 2024) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही दिल्लीतच आहेत. यामुळे राज ठाकरेंचा महायुतीत सहभागी होणार की काय? अशा चर्चांना उधाण आले आहे.

(हेही वाचा – Electoral Bonds : निवडणूक रोख्यांचा तपशील देण्यास राजकीय पक्षांचा नकार)

या सर्व चर्चांवर आता स्वतः राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

(हेही वाचा – अनुभवालाच खरा शिक्षक मानणारा जगप्रसिद्ध माहितीपट छायाचित्रकार Sudhakar Olve)

काय म्हणाले राज ठाकरे ?
राज ठाकरे (Raj Thackeray) हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. दिल्लीत पोहोचल्यावर राज ठाकरेंना तुमचं शेड्यूल्ड काय आहे? महायुतीत सामील होणार का? असे प्रश्न पत्रकारांनी विचारले. त्यावर राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘माझं शेड्युल्ड काय आहे अद्याप मला माहिती नाही, असे त्यांनी सांगितले. मला फक्त ‘या म्हणून’ सांगितलंय. आता दिल्लीत आलोय. पाहू ! अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी (Raj Thackeray) दिली.

‘योग्य तो सन्मान राखू’ :

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचे नेते आहेत. मागच्या काळात त्यांचे आणि आमच्या पक्षाचे अनेक मुद्द्यावर एकमत झाले आहे. त्यांनी कट्टर प्रांतवादाची भूमिका सोडली आणि हिंदुत्वाची व्यापक भूमिका घेतली तर ते नक्कीच आमच्यासोबत असतील, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्यांकडून येत आहे. तसेच राज ठाकरेंचा (Raj Thackeray) योग्य तो मान राखला जाईल,असेही त्यांनी सांगितले.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : संध्याकाळी 7 वाजेपर्यत निर्णय सांगा, अन्यथा आमचं ठरलंय; प्रकाश आंबेडकरांना मविआचा इशारा)

अमित शहांच्या नेतृत्वाखाली होणार बैठक :

राज ठाकरे (Raj Thackeray) दिल्लीला पोहोचले तेव्हा त्यांचे पुत्र अमित ठाकरेदेखील त्यांच्यासोबत होते. महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीमध्ये अमित शहांच्या नेतृत्वाखाली भाजप नेत्यांची महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत बावनकुळे असे राज्यातील महत्वाचे नेतेही उपस्थित आहेत. यासोबत राज ठाकरेंना या बैठकीचे निमंत्रण गेल्याने महायुतीत मनसेला स्थान मिळण्याची शक्यता अधिक बळावली आहे. (Raj Thackeray)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.