Lok Sabha Election 2024 : संध्याकाळी 7 वाजेपर्यत निर्णय सांगा, अन्यथा आमचं ठरलंय; प्रकाश आंबेडकरांना मविआचा इशारा

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीकडे जागावाटपाचे दोन फॉर्म्युले तयार असून प्रकाश आंबेडकर सोबत आले नाहीत, तर त्यांच्याविना निवडणूक लढवली जाण्याची तयारी करण्यात आली आहे.

156
Lok Sabha Election 2024 : संध्याकाळी 7 वाजेपर्यत निर्णय सांगा, अन्यथा आमचं ठरलंय; प्रकाश आंबेडकरांना मविआचा इशारा
Lok Sabha Election 2024 : संध्याकाळी 7 वाजेपर्यत निर्णय सांगा, अन्यथा आमचं ठरलंय; प्रकाश आंबेडकरांना मविआचा इशारा

लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. अनेक ठिकाणी उमेदवारीही घोषित करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटल्याचे दिसत नाही. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी जास्तीच्या जागांसाठी ताणून धरले आहे. त्यामुळे जागावाटपावर अंतिम निर्णय होत नसल्याचे चित्र आहे. (Lok Sabha Election 2024)

महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) वंचितला चार जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. नुकतेच शिवाजी पार्क येथे झालेल्या राहुल गांधींच्या सभेला प्रकाश आंबेडकरांनी उपस्थिती लावल्यामुळे ते महाविकास आघाडीसोबत असणार हे स्पष्ट झाले आहे. पण वंचितने अद्यापही आपला निर्णय राखून ठेवला आहे.

(हेही वाचा – अनुभवालाच खरा शिक्षक मानणारा जगप्रसिद्ध माहितीपट छायाचित्रकार Sudhakar Olve)

प्रकाश आंबेडकर जर सोबत आले तर त्यांना किती जागा द्यायच्या हे ठरल्या आहेत. तर ते सोबत आले नाहीत तर त्यांच्याविना महाविकास आघाडीचे जागावाटप ठरल्याची माहितीही समोर येत आहे. त्यामुळे आज, मंगळवार संध्याकाळी सात वाजेपर्यंत तुमचा काय तो निर्णय द्या, अन्यथा आम्ही आमचं वेगळं लढू असा अल्टिमेटम आता महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांना दिल्याची माहिती समोर येत आहे.

 महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला 22-16-10

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडे जागावाटपाच्या फॉर्म्युलाचे दोन पर्याय तयार आहेत, असे सांगण्यात येते. प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी ऐनवेळी महाविकास आघाडीत आली नाही, तर महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला 22-16-10 असा राहील. त्यानुसार उबाठा गट 22, काँग्रेस 16 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी १० जागांवर लढण्याची शक्यता आहे.

वंचित महाविकास आघाडीत दाखल झाल्यास, 20-15-9-4 हा जागावाटपाचा फॉर्म्युला राहील. त्या परिस्थितीत उबाठा गटाला 20, काँग्रेसला 15, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नऊ आणि वंचितला चार जागा देण्यात येतील. वंचितला उबाठा गटाच्या कोट्यातून दोन, काँग्रेसच्या कोट्यातून एक आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून एक जागा देण्याची तयारी आहे. त्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेवर आता मविआचे जागावाटप अंतिम होणार आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.