Cabinet Meeting In Sambhaji Nagar : मराठवाड्यातील सिंचनासाठी 59 हजार कोटींची तरतूद; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

128
Cabinet Meeting In Sambhaji Nagar : मराठवाड्यातील सिंचनासाठी 59 हजार कोटींची तरतूद; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Cabinet Meeting In Sambhaji Nagar : मराठवाड्यातील सिंचनासाठी 59 हजार कोटींची तरतूद; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मराठवाड्यासाठी एकूण 14 हजार कोटींच्या सिंचन प्रकल्पाबाबत निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले. (Cabinet Meeting In Sambhaji Nagar) मराठवाड्यात ७ वर्षांनी मंत्रिमंडळ बैठक आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह सर्वच मंत्री या बैठकीत सहभागी झाले होते. ‘आजच्या बैठकीत मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पाबाबत एकूण 59 हजार कोटींचा निर्णय झाला असून, त्यात नदीजोड प्रकल्पाच्या 14 हजार कोटीचा समावेश आहे, असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.

(हेही वाचा – MAHADA : म्हाडाच्या माध्यमातून अधिकाधिक परवडणारी घरे सर्वसामन्यांना उपलब्ध करून देणार – संजीव जयस्वाल)

दरम्यान बैठकीत झालेल्या निर्णयांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली. एकनाथ शिंदे म्हणाले, ”मराठवाड्याला न्याय देण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. मराठवाडा मोठी झेप घेत आहे. वर्षभरात आमच्या सरकारने घेतलेले निर्णय सर्वसामान्यांचे हीत डोळ्यासमोर ठेऊन घेतले. आतापर्यंत शेतीला पाणी पाहिजे म्हणून ३५ सिंचन प्रकल्पाला आम्ही मान्यता दिली. ८ लाख हेक्टर जमीन यामुळे ओलीताखाली आली. आम्ही फक्त घोषणा करत नाहीत तर अंमलबजावणी करतो. आम्ही सरकारमध्ये आलो तेव्हा आम्ही पहिला विषय मराठवाड्याची वाहून जाणाऱ्या पाण्याला वळवण्याचा निर्णय घेतला. समृद्धी महामार्ग मराठवाड्याला लागून जातो, त्याचा फायदा मराठवाड्याला होईल.” (Cabinet Meeting In Sambhaji Nagar)

मंत्रिमंडळ बैठकीत आज झालेले निर्णय

१. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील सिंचनासाठी साखळी सिमेंट बंधारे तसेच अंबड प्रवाही योजना दिंडोरी जिल्हा नाशिक.

२. पश्चिमवाहिनी नद्याद्वारे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याबाबत निर्णय घेण्यात आला. यावर १३ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

३. ३५ सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता दिली

४. सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये १२ हजार ९३८ कोटी ८५ लाख दिले आहेत.

५. महिला सक्षमीकरणावर बैठकीत चर्चा झाली.

६. आदर्श पतसंस्थेच्या संचालकांच्या प्रॉपर्टी जप्त करू.

७. कृषी, क्रीडा. पर्यटनासह सर्व विभागाला निधी

८. मराठाड्यातील ग्रामपंचायतींना इंटरनेट जोडणार, यासाठी २८४ कोटींचा निधी लागले.

९. पुणे संभाजीनगर मार्गावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम बसवणे – १८८ कोटींचा निधी

१०. पैठणमधील संत ज्ञानेश्वर उद्यान विकसित करण्यासाठी १५० कोटींचा निधी जाहीर करण्यात आला

११. शनी देवगाव उच्च पातळी बंधारा – २८५ कोटी

१२. परभणीच्या पाथरीतील साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा – ९१.८० कोटी

१३. औढा नागनाथ तीर्थक्षेत्राचा विकास – ६० कोटी

१४. मराठवाड्यात दूध उत्पादनाला वेग देण्यासाठी ३ हजार २२५ कोटी रुपयांची निधी

१५. वैयक्तिक बचत गट शेतकरी उत्पादक कंपन्यांना किमान ५ आणि कमाल १० दुधाळ जनावरांचे वाटप

१६. एका गावात किमान ५० दुधाळ जनावरांचे अनुदान तत्त्वावर वाटप

१७. मराठवाड्यातील १ हजार ३० कि मी लांबीच्या ३१ रस्त्यांची सुधारणा

23 विषय मार्गी लागले असून, 7 विषय प्रगतीपथावर ! – देवेंद्र फडणवीस

बऱ्याच वर्षांनी मराठवाड्यात मंत्रीमंडळाची बैठक होत आहे. ही बैठक होऊच नये, यासाठी विरोधकांनी प्रयत्न केले. मागील बैठकीत आम्ही 31 निर्णय घेतले होते. 2017 मध्ये यातील 10 विषय मार्गी लागले होते. तर आज घडीला यातील 23 विषय मार्गी लागले असून, 7 विषय प्रगतीपथावर असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाड्याच्या विकासाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यापूर्वी २०१६ मध्ये मराठवाड्याच्या समस्यांबाबत संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक झाली होती, तर २००८ मध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मराठवाड्यात एकदा मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. म्हणजे १६ वर्षात मराठवाड्यात मंत्रिमंडळाच्या दोनच बैठका झाल्या आहेत. (Cabinet Meeting In Sambhaji Nagar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.