President Draupadi Murmu : राष्ट्रपती मुर्मू यांना ‘या’ देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान; ठरल्या पहिल्या भारतीय महिला

सुरीनाम प्रजासत्ताकचे अध्यक्ष चंद्रिका प्रसाद संतोखी यांनी सोमवार ५ जून रोजी राष्ट्रपती मुर्मू यांना 'द ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ यलो स्टार' हा पुरस्कार प्रदान केला.

277
President Draupadi Murmu : राष्ट्रपती मुर्मू यांना 'या' देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान; ठरल्या पहिल्या भारतीय महिला

देशाच्या अठराव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांना सुरीनाम या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सुरीनाम प्रजासत्ताकचे अध्यक्ष चंद्रिका प्रसाद संतोखी यांनी सोमवार ५ जून रोजी राष्ट्रपती मुर्मू यांना ‘द ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ यलो स्टार’ हा पुरस्कार प्रदान केला. हा पुरस्कार मिळवणाऱ्या राष्ट्रपती मुर्मू या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत.

सुरीनाम हा दक्षिण अमेरिकेतील एक देश आहे. सुरीनामच्या पूर्वेला गयाना, पश्चिमेला फ्रेंच गयाना व दक्षिणेला ब्राझील हे देश तर उत्तरेला अटलांटिक महासागर आहे. पारामारिबो ही सुरीनामची राजधानी आहे. सुरीनाम हा दक्षिण अमेरिका खंडात क्षेत्रफळाच्या व लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान देश आहे. तसेच तेथे डच ही भाषा राष्ट्रीय भाषा म्हणून बोलली जाते. सुरीनामच्या जवळजवळ ५ लाख लोकसंख्येपैकी ३७% लोक भारतीय वंशाचे आहेत. १९व्या शतकात उत्तर प्रदेशच्या पूर्व भागातून आणि बिहारमधून आलेले अनेक कामगार येथे स्थायिक झाले. त्यांचे वंशज सुरीनामच्या लोकसंख्येचा मोठा हिस्सा आहेत.

(हेही वाचा – Maharashtra BJP : भाजपा सर्व जिल्ह्यांचे अध्यक्ष बदलण्याच्या तयारीत; बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली कोअर कमिटीची बैठक)

राष्ट्रपती मुर्मू (President Draupadi Murmu) रविवारी सुरीनामला पोहोचल्या. राजधानी पारमारिबो येथील जोहान अॅडॉल्फ पेंगेल विमानतळावर राष्ट्रपती चंद्रिका संतोखी यांनी त्यांचे पूर्ण राज्य सन्मानाने स्वागत केले.

दोन्ही देशांमधील व्यापार क्षमतेपेक्षा कमी

राष्ट्रपती मुर्मू (President Draupadi Murmu) म्हणाल्या, भारताप्रमाणेच सुरीनाममध्येही अनेक जाती, धर्म आणि भाषांचे लोक राहतात. भारत आणि सुरीनाममधील मैत्री ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांवर आधारित आहे. मात्र, दोन्ही देशांमधील व्यापार क्षमतेपेक्षा खूपच कमी आहे. द्विपक्षीय व्यापार वाढवण्यासाठी सहकार्य वाढवण्याची गरज आहे. संरक्षण, आयुर्वेद आणि फार्मा क्षेत्रातील सहकार्य आणखी वाढवता येईल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.