Prakash Ambedkar यांनी तुषार गांधींचा घेतला समाचार

149
Mahatma Gandhi यांच्या नातवाने Ambedkar यांच्या ‘वंचित’ला भाजपाची B-Team का म्हटले?
Mahatma Gandhi यांच्या नातवाने Ambedkar यांच्या ‘वंचित’ला भाजपाची B-Team का म्हटले?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यावर भाजपाची (BJP) ‘बी टीम’ असल्याचा आरोप २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर काही राजकीय पक्षांकडून करण्यात येत होता. आता थेट महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी (Tushar Gandhi) यांनीही प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमागे (Vanchit Bahujan Alliance) भाजपाचा हात असावा, असे सांगत ‘भाजपाची बी टीम’ या आरोपाचा पुनरुच्चार केला. तर ‘मूर्खपणाचे आणि बिनबुडाचे आरोप करण्यात वेळ घालवू नका’ असा सल्ला आंबेडकर यांनी गांधींना दिला.

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024 : ख्रिस्ती समुदायाला खुश करण्यासाठी शरद पवार-सुप्रिया सुळे चर्चमध्ये; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल)

भाजपाचा फायदा

मोहनदास करमचंद गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवांमध्ये जुंपली असल्याचे चित्र राज्यातील राजकरणात दिसत आहे. तुषार गांधी (Tushar Gandhi) यांनी माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे (Vanchit Bahujan Alliance) कॉँग्रेस (Congress) आणि पुरोगामी पक्षांचे नुकसान होणार असून भाजपाचा फायदा होणार असल्याचे म्हटले. यामागे भाजपा आहे का? असे विचारले असता, “निवडणुकीत फायदा तर भाजपाचा होणार आहे. त्यामुळे भाजपाचाच हात असावा असे वाटते,” असे गांधी म्हणाले. (Mahatma Gandhi)

राष्ट्रहित बघायची गरज होती

“वंचितने ही जबाबदारी समजायला हवी होती. किमान या निवडणुकीत तरी आंबेडकर यांनी एक स्पष्ट भूमिका घ्यायला हवी होती. स्वतःचा फायदा बाजूला ठेऊन राष्ट्रहित बघायची गरज होती आणि ते त्यांनी केलं नाही,” असे गांधी म्हणाले. (Mahatma Gandhi)

(हेही वाचा- Mahila Bachat Gat Product : महिला बचत गटांची उत्पादने डबेवाल्यांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचणार)

चुकीचे, निराधार विधान

आंबेडकरांनी आपली प्रतिक्रिया X या समाजमाध्यमावर व्यक्त केली. “तुम्ही अलीकडे केलेले विधान अत्यंत चुकीचे, कोणताही आधार नसलेले आणि वंचित बहुजनांच्या राजकारणात अडथळा निर्माण करणारे आहे; पण संसदीय लोकशाही आणि स्वतंत्र राजकीय नेतृत्वासाठीच्या प्रयत्नांना, तसेच वर्ग, जात आणि धर्माच्या पलीकडे जावून सुरू असलेल्या सर्वसमावेशक राजकारणाला नाकारणारे आहे,” असे म्हटले. (Mahatma Gandhi)

आंबेडकर यांनी पुढे म्हटले आहे की,”तुमच्या आजोबांची ब्रिटिशांविरुद्धची चळवळ सर्वसमावेशक होती, पण तुमचे विचार आणि राजकारणामध्ये तशी स्पष्टता दिसत नाही,” असा टोलाही आंबेडकर यांनी लगावला. (Mahatma Gandhi)

(हेही वाचा- Sharad Pawar : २०१४ पासूनच भाजपासोबत जाण्यासाठी प्रयत्नरत होते; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट)

मविआ-भाजपा नेत्यांमध्ये तडजोड

तुषार गांधी (Tushar Gandhi) यांची कानउघडणी करताना आंबेडकर यांनी म्हटले आहे की, “महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीसोबत कसा व्यवहार केला हे तुम्हाला माहिती नाही का? त्यांचे राजकारण किती अलिप्त आहे, हे तुम्हाला माहीत नाही का? महाविकास आघाडी आणि भाजपच्या (BJP) नेत्यांमध्ये झालेली तडजोड तुम्हाला माहिती नाही का?” असे प्रश्न आंबेडकर यांनी गांधीना केले. (Mahatma Gandhi)

तुम्ही डोळे बंद केले असावेत

गांधी यांच्या आरोपांना उत्तर देत आंबेडकर यांनी “तुम्ही बहुदा डोळे बंद केले असावे,” अशा शब्दात सुनावले. (Mahatma Gandhi)

“जर तुमच्याकडे राजकीय ज्ञान आणि समज नसेल, तर निरर्थक गोष्टी करण्यात आणि निराधार आरोप करण्यात तुमचा वेळ घालवू नका. काळच सत्य परिस्थिती समोर आणेल. खरं तर, आताच सगळे संकेत दिसत आहेत. पण, तुम्ही डोळे झाकल्यासारखे संदर्भहीन ज्याला काहीही आधार नाही,” असे वक्तव्य करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करीत असल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले आहे. (Mahatma Gandhi)

(हेही वाचा- Teacher : शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार)

मी सत्य मांडले

आंबेडकर यांनी गांधीना सूनावल्यानंतर गांधी यांनी पुन्हा X वर पोस्ट केली. त्यात त्यांनी “वंचित बहुजन आघाडीला ‘भाजपाची बी टीम’ या माझ्या व्यक्तव्याचा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचा आदर याच्याशी काही संबंध नाही तसेच दलितांबद्दलचा तिरस्कारही नाही. मी फक्त वस्तुस्थिती मांडली जे अनेकजण सार्वजनिकरित्या बोलण्यास संकोच बाळगतात,” असे म्हटले आहे. (Mahatma Gandhi)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.