Bachchu Kadu यांची नाराजी दूर?; मंत्रालयाशेजारील जनता दलाच्या कार्यालयाची जागा ‘प्रहार जनशक्तीला’

राज्य सरकारच्या या निर्णयावर जनता दलाच्या नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

93
Bachchu Kadu यांची नाराजी दूर?; मंत्रालयाशेजारील जनता दलाच्या कार्यालयाची जागा 'प्रहार जनशक्तीला'
Bachchu Kadu यांची नाराजी दूर?; मंत्रालयाशेजारील जनता दलाच्या कार्यालयाची जागा 'प्रहार जनशक्तीला'

मंत्रिमंडळ विस्तार आणि अन्य मुद्द्यांवरून सरकारला सातत्याने घेरणाऱ्या बच्चू कडू यांना राज्य शासनाने मोठे गिफ्ट देऊ केले आहे. त्यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला मंत्रालयाशेजारी कार्यालय उघडण्यासाठी ७०० चौ. फू. जागा देण्यात आली असून, त्यांना कार्यालयासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

मंत्रालयाशेजारील जीवन बीमा मार्गावर योगक्षेम समोर जनता दलाचे (सेक्युलर) कार्यालय आहे. १९६२ मध्ये जनता दलाला येथे पक्ष कार्यालयासाठी ९०९ चौ. फू. जागा देण्यात आली होती. हे कार्यालय राज्यातील अनेक चळवळी आणि आंदोलनांचे केंद्र राहिले आहे. मात्र, कालानुरूप जनता दलाची पडझड सुरू झाली आणि हळूहळू इथली गर्दी लुप्त झाली. त्यामुळे इथली ७०० चौ. फूट जागा ‘प्रहार जनशक्ती’ पक्ष कार्यालयाला वाटप करण्याचा निर्णय युती सरकारने घेतला आहे.

यानिमित्ताने बच्चू कडू यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना कडू यांनी स्वबळाची भाषा सुरू केली होती. त्यामुळे भविष्यात प्रहार जनशक्तीकडून होणारी मत विभागणी टाळण्यासाठी कडू यांना खुश करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

(हेही वाचा – Central Reserve Police Force : गणवेशात व्हिडियो आणि रिल बनवू नका, केंद्रीय सुरक्षा रक्षकांसाठी कडक निर्देश)

जनता दलाचा विरोध

  • राज्य सरकारच्या या निर्णयावर जनता दलाच्या नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. राज्य सरकारने आपला निर्णय बदलावा, अन्यथा पक्षाचे नेते मंत्रालयासमोर उपोषणाला बसतील.
  • कुठलीही शहानिशा न करता हे कार्यालय परस्पर प्रहार संघटनेला देत सरकारने चळवळीचा जुना इतिहास पुसण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप जनता दलाचे प्रभारी प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी केला.
  • सरकारच्या या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.