प्रबोधनकार नास्तिक नव्हते! उद्धव ठाकरेंचे महत्वपूर्ण विधान

प्रबोधन नियतकालिकेतील केशव सिताराम ठाकरे यांचे लेख असलेले ‘प्रबोधन’ मधील प्रबोधनकार या त्रिखंडात्मक ग्रंथांचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे झाले.

108

नेता म्हणून लोकशाहीत मत महत्वाचे आहे पण लोकांमध्ये काम करीत असतांना हिंमत सुद्धा आवश्यक आहे. प्रबोधनकारांनी ती दाखवली. पूर्वीच्या काळातल्या वाईट चालिरीतींच्या विरोधात प्रबोधनकार ठामपणे उभे राहिले. ते नास्तिक नव्हते मात्र धर्माच्या नावावरील ढोंग त्यांना आवडत नव्हते. देश हाच धर्म अशी शिकवण त्यांनी दिली, परंतू स्वत:च्या धर्माविषयी वाईट विचाराने समोरुन कोणी आला तर मी एक कडवट हिंदू आहे हे लक्षात घ्यावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

प्रबोधन नियतकालिकेतील केशव सिताराम ठाकरे यांचे लेख असलेले ‘प्रबोधन’ मधील प्रबोधनकार या त्रिखंडात्मक ग्रंथांचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. प्रबोधनच्या शताब्दी निमित्त प्रसिद्ध झालेल्या या त्रिखंडात्मक ग्रंथाचे संपादक ज्येष्ठ पत्रकार सचिन परब, डॉ. रणधीर शिंदे, ज्ञानेश महाराव, सुनिल कर्णिक व विश्वंभर चौधरी यांना सन्मानित करण्यात आले. तसेच स्व. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या balasahebthakaray.in या संकेतस्थळाचे लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

(हेही वाचा : सेनेचा दसरा मेळावा की निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले?)

ग्रंथांचे भाषांतर झाले पाहिजे

आपल्या नातवांचे लाड करणारे आजोबा प्रबोधनकार यांच्याविषयी आठवणी जागवतांना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, प्रबोधनकार कडक शिस्तीचे होते ते आम्हाला बाळासाहेब सांगायचे. आमच्या लहानपणी आजोबांनी राजा राणीच्या गोष्टी सांगितल्या नाही तर त्यांच्या विचारांच्या गोष्टी सांगितल्या. प्रबोधनकार यांचे विचार जगातील सर्व कानाकोपऱ्यामध्ये पोहचले पाहिजे त्यासाठी त्यांच्या ग्रंथांचे भाषांतर झाले पाहिजे. शंभर वर्ष झाल्यानंतर माझ्या हस्ते या ग्रंथांचे प्रकाशन होत आहे हे माझ्यासाठी समाधान देणारे आहे. हीच भावना बाळासाहेबांवरील ‘फटकारे’ पुस्तकाचे प्रकाशन केले त्यावेळी होती.

या ग्रंथाचे स्वागत होईल – सुभाष देसाई

प्रबोधन या नियतकालिकाने बुद्धीप्रामाण्य व्यक्तिस्वातंत्र्य, सामाजिक समता, ऐहिक जीवनसमृद्धी आणि ज्ञाननिष्ठा या मूल्यांचा पुरस्कार केला. महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळ आणि त्यातील प्रबोधन परंपरा प्रबोधनाच्या उल्लेखाशिवाय अपूर्णच राहील. पुरोगामी महाराष्ट्राची जडणघडण करण्यात प्रबोधन या नियतकालिकेचा मोलाचा वाटा आहे. या ग्रंथांचे सर्वत्र स्वागत होईल, असा विश्वास मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.