संदेशखली येथील भाजपाच्या उमेदवार Rekha Patra यांना PM Narendra Modi यांचा फोन; शक्तिस्वरुपा म्हणून केले संबोधन 

121

पश्चिम बंगालमध्ये संदेशखली येथे स्थानिक लोकांच्या जमिनी बळकावणारा टीएमसीचा नेता शाहजहान शेख याला अटक करण्यात आली आहे. शाहजहान अनेक वर्षे येथील विवाहित तरुण महिलांवर पक्ष कार्यालयात आणून त्यांच्यावर अत्याचार करायचा, असा गंभीर आरोप त्याच्यावर आहेत. त्याच्या अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांनी अखेर रस्त्यावर उतरून त्याच्याविरोधात बंड पुकारले. त्यानंतर देशभरात हा विषय वाढला. लोकसभा निवडणुकीत भाजपाने शाहजहान शेखच्या अत्याचाराला बळी पडलेल्या रेखा पात्रा (Rekha Patra) यांना उमेदवारी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी स्वतः रेखा पात्रा यांना फोन करून त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी त्यांना शक्तिस्वरुपा असा उल्लेख केला.

संपूर्ण देशाला आपला अभिमान वाटेल, असे पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले. तर, रेखा पात्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रभू रामचंद्रांचे प्रतीक म्हणत, त्यांचा हात डोक्यावर असल्याने आपल्याला मोठा अभिमान वाटत असल्याचे म्हटले आहे. तसेच, आपला लढा कुणा पक्षाचा नाही, तर बशीरहाटमधील सर्व पीडितांचा लढा आहे, असेही रेखा यांनी म्हटले.

(हेही वाचा Muslim : मीरा रोडमध्ये पुन्हा धार्मिक हिंसाचार; अल्पवयीन हिंदू तरुणाने ‘जय श्रीराम’ म्हटल्याने धर्मांध मुसलमानांकडून मारहाण; ‘अल्लाहू अकबर’ म्हणायला भाग पाडले)

अत्याचाराबद्दल टीएमसी कार्यकर्त्यांनी मागितली माफी

भारतीय जनता पक्षाने रेखा पात्रा (Rekha Patra) यांना पश्चिम बंगालच्या बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. संदेशखली येथील टीएमसी नेते शाहजहान शेख यांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या पीडितांपैकी त्या एक आहेत. पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी रेखा पात्रा यांना लोकसभेचे तिकीट मिळाल्यानंतर आजूबाजूचे वातावरण, लोकांच्या प्रतिक्रिया यासंदर्भातही विचारले असता, रेखा पात्रा (Rekha Patra) म्हणाल्या, अनेकांनी फोन आणि व्हिडिओ कॉल करून अभिनंदन केले. टीएमसीतीलही अनेकांचे फोन आले. संदेशखलीतील अत्याचाराबद्दल त्यांनी माफीही मागितली आणि पक्षातील वरिष्ठांच्या सांगण्यावरून आपण असे केल्याचेही सांगितले. भाजपची उमेदवारी मिळाल्याबद्दल त्यांनीही रेखा यांचे अभिनंदन केले आहे. अत्याचार करणारे लोक आपल्या ओळखीचेच आहेत. हे सर्व त्यांनी टीएमसीच्या वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरून केले. आपल्या मनात त्यांच्याबद्दल कसलाही राग नाही. सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण लढणार आहोत, असे रेखा पात्रा म्हणाल्या.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.