पंतप्रधान मोदी म्हणाले… UP+YOGI, बहुत है उपयोगी’

109

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथे ६०० किमी लांबीच्या गंगा एक्सप्रेस वेची पायाभरणी केली. यावेळी रॅलीला संबोधित केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज जेव्हा त्या माफियांवर बुलडोझर चालविला जात आहे, परंतु बुलडोझर बेकायदेशीर इमारतींवर चालविला जातो. पण आज त्याचं दुःख पालन पोषण करण्याला होतंय, म्हणूनच आज यूपीची जनता म्हणू लागली आहे –’UP+YOGI’ म्हणजे खूप उपयोगी (UPYOGI). यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशच्या विकासासाठी योगी सरकारची गरज असल्याचे सांगितले.

ते म्हणाले की, गंगा एक्सप्रेस वे यूपीच्या विकासाला चालना देईल. विमानतळ, मेट्रो, जलमार्ग, डिफेन्स कॉरिडॉरही याला जोडले जाणार आहेत. यासह ते असेही म्हणाले की, योगीजींच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होण्यापूर्वी पश्चिम उत्तर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्थेची काय स्थिती होती, हे जनतेला चांगलेच माहीत आहे. आज माफियांवर बुलडोझर चालला की, त्याचे पालनपोषण करणाऱ्यालाच वेदना होतात. त्यामुळे यूपीच्या जनतेला फक्त योगी सरकार हवे आहे. गेल्या साडेचार वर्षांत योगीजींच्या सरकारने परिस्थिती सुधारण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.

असा आहे गंगा एक्सप्रेस वे 

गंगा एक्सप्रेस वे हा उत्तर प्रदेशातील सर्वात मोठ्या लांबीचा द्रुतगती मार्ग असल्याचे म्हटले जाते. या एक्सप्रेस वेची लांबी 594 किमी असणार आहे. गंगा एक्स्प्रेस वे मेरठ ते प्रयागराजपर्यंत उत्तर प्रदेशातील 12 जिल्ह्यांतून जाणार आहे. हा एक्स्प्रेस वे यूपीच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणार आहे. हा एक्सप्रेसवे मेरठ-बुलंदशहर रस्त्यावर मेरठच्या बिजौली गावातून सुरू होईल आणि प्रयागराज बायपासवर जुडापूर दांडू गावाजवळ संपणार आहे.

(हेही वाचा – शिवसेनेच्या मुळावर उठलेले अनिल परब गद्दार! कदमांचा परबांवर हल्लाबोल)

देशाचा वारसा ही काही लोकांची समस्या

पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, येथे असे काही राजकीय पक्ष आहेत ज्यांना देशाचा वारसा आणि देशाच्या विकासाच्या समस्या आहेत. या राजकीय पक्षांना त्यांच्या व्होटबँकेची जास्त चिंता आहे त्यामुळे त्यांना देशाचा वारसा ही समस्या वाटते. देशाच्या विकासाचा प्रश्न असा आहे की, गरीब आणि सामान्य माणसाचे त्यांच्यावरचे अवलंबित्व दिवसेंदिवस कमी होत आहे. या लोकांना गंगा नदीच्या स्वच्छता अभियानाची अडचण आहे. हे लोकच दहशतवाद्यांच्या विरोधात लष्कराच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. या लोकांनीच भारतीय शास्त्रज्ञांनी बनवलेली मेड इन इंडिया कोरोना लस गोत्यात टाकली. या लोकांना काशीमध्ये बाबा विश्वनाथांच्या भव्य धाम बांधण्याची समस्या आहे. या लोकांना अयोध्येत भगवान श्री रामाचे भव्य मंदिर उभारण्यात अडचण आहे. योगीजींच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होण्यापूर्वी पश्चिम उत्तर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती काय होती हे तुम्हाला चांगलेच माहीत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.