शिवसेनेच्या मुळावर उठलेले अनिल परब गद्दार! कदमांचा परबांवर हल्लाबोल

152

गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेत अंतर्गत वाद सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या अंतर्गत कलहाला अखेर वाचा फुटली आहे. आज शिवसेनेचे नेत रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत परिवहन नेते अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप करत हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी असे म्हटले की, शिवसेनेच्या मुळावर उठलेले अनिल परब निष्ठावंत कसे असू शकतात ते गद्दार आहेत. गेल्या तीन चार महिन्यापासून माझ्या संदर्भात मीडियात उलट सुलट चर्चा सुरु आहे. माझी भूमिका सर्वांना समजावी म्हणून माझी बाजू मांडत आहे. मला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनिल परब यांनी जिल्हा वाऱ्यावर सोडला आहे. पालकमंत्री म्हणून त्यांचा संपर्क नाही. मी त्यांच्या हॉटेलवरती बोललो म्हणून मी पक्षाच्या विरोधात बोललो नाही, असेही ते म्हणाले.

काय म्हणाले रामदास कदम

शिवसेने विरोधात कोणतेही कृत्य केले नाही. किरीट सोमय्या आणि माझा काहीही संपर्क नाही. असे वक्तव्य करताना रामदास कदमांनी बाळासाहेबांची शपथ देखील घेतली. यावेळी त्यांनी अनिल परबांवर देखील गंभीर आरोप केलेत. माझ्या मुलाला तिकीट मिळू नये म्हणून अनिल परब यांनी खूप प्रयत्न केले. अनिल परब यांनी मनसे आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकारी यांना हाताशी धरुन आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला आहेत. राष्ट्रवादीचे संजय कदम यांना ते मातोश्री वरती घेऊन गेले पण उद्धव ठाकरे यांनी ऐकले नाही. योगेशने दोन वर्ष फोन केले मात्र एकही कॉल त्यांनी उचलला नसल्याचे कदम यांनी सांगितले.

(हेही वाचा – काँग्रेसपाठोपाठ आता भाजपचं मिशन गोवा)

गद्दार कोण हे शिवसैनिकांना कळायला हवं

पुढे रामदास कदम असेही म्हणाले, संजय कदमशी सातत्याने संपर्क ठेवला. या भागात वैभव खेडेकर आणि संजय कदम यांना सातत्याने पाठी घालण्याचे काम केले आहे. अनिल परब हे कदम आणि खेडेकरांचे महात्मा गांधी आहेत, गद्दार कोण अनिल परब की रामदास कदम हे शिवसैनिकांना कळलं पाहिजे. मंत्रीपद मिळाल्यानंतर शिवसेनेच्या मुळावर अनिल परब उठला. दापोली आणि मंडणगड नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत. योगेश कदम आमदार आहेत. त्यांनी उमेदवार पाहिले पक्षाला कळवलं आणि पक्षनेत्यांनी मुलाखती घेतल्या. पण संजय कदमने भगवा झेंडा जाळून पायाखाली तुडवला होता. कदमला गाडून आम्ही भगवा फडकवला.

परब हा निष्ठावंत शिवसेनेचा नेता कसा?

यावेळी यावेळी अनिल परबने मिटिंग बोलावली तटकरे आणि सूर्यकांत दळवी या मिटिंगला होते. पाच वर्ष या सूर्यकांत दळवीने संजय कदमच्या खांद्याला खांदा लावून माझ्या मुलाविरोधात काम केले. आमच्या पक्षाचे निष्ठावंत नेते उदय सामंत यांना बोलावून घेतले. त्यांच्याकडून निष्ठा शिकावी लागते. त्यांना परब यांनी बोलावलं आणि तिकीट वाटप केले. तेव्हा राष्ट्रवादी 9 तर शिवसेनाला 5 जागा दिल्यात. शिवसेनेची पाच वर्ष सत्ता असतानाही राष्ट्रवादीला नगराध्यक्षपद दिले गेले यानंतरही परब हा निष्ठावंत शिवसेनेचा नेता कसा? असा सवालही रामदास कदम यांनी उपस्थितीत केला आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.