Petrol – Diesel Price : पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? जागतिक बाजारातील ‘या’ मोठ्या बदलामुळे मोदी सरकारवर वाढला दबाव!

Petrol - Diesel Price : पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? जागतिक बाजारातील 'या' मोठ्या बदलामुळे मोदी सरकारवर वाढला दबाव!

94
Petrol - Diesel Price : पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? जागतिक बाजारातील 'या' मोठ्या बदलामुळे मोदी सरकारवर वाढला दबाव!
Petrol - Diesel Price : पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? जागतिक बाजारातील 'या' मोठ्या बदलामुळे मोदी सरकारवर वाढला दबाव!
प्रतिनिधी

​गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या केवळ एका महिन्यात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल सुमारे ३० डॉलरने कमी झाला आहे. जागतिक स्तरावर इंधन स्वस्त होत असतानाही, देशांतर्गत बाजारात मात्र पेट्रोल आणि डिझेलचे दर(Petrol – Diesel Price)जैसे थे असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री बसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी केंद्र सरकारवर थेट निशाणा साधला आहे.(Petrol – Diesel Price)

(हेही वाचा – Rain Update: मोसमी पावसाच्या संथ वाटचालीचा पर्यटन व्यवसायावर परिणाम, पर्यटक ६० टक्क्यांनी कमी; आणि… )

​जयंतराव पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या विषयावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. कच्च्या तेलाचे दर कमी होऊनही त्याचा कोणताही लाभ भारतीय ग्राहकांना मिळत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. इंधनाचे वाढते दर हे देशातील शेतकरी, कष्टकरी कामगार, छोटे-मोठे व्यावसायिक आणि मध्यमवर्गीय नागरिकांच्या आर्थिक नियोजनावर थेट घाला घालत आहेत, असेही त्यांनी नमूद केले आहे.(Petrol – Diesel Price)

​वाढत्या महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकारने आता तरी तत्काळ पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी कराव्यात, अशी ठाम मागणी पाटील यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. जागतिक बाजारातील घसरणीचा फायदा देशातील जनतेला मिळवून देणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. आता केंद्र सरकार या मागणीची दखल घेऊन इंधनाचे दर कमी करणार का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.(Petrol – Diesel Price)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.