
पावसाळ्यात रहिवाशांच्या सुरक्षिततेला कोणताही धोका होऊ नये, यासाठी म्हाडा(MHADA)अॅक्शन मोडवर आहे. डोंगर उतारावर राहणाऱ्या रहिवाशांच्या जीविताला दरड कोसळून धोका निर्माण होऊ नये, यासाठी शहर जिल्ह्यात ३९ आणि उपनगर जिल्ह्यात ९७ संरक्षक भिंती उभारण्यात येत आहे.(MHADA)
पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण केली जातील, असे मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे मुख्य अधिकारी सतीश भारतीय यांनी शुक्रवारी आयोजित पावसाळ्यापूर्व तयारी आढावा बैठकीत सांगितले.(MHADA)
म्हाडाने ८६ अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींतील रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी युद्धपातळीवर काम करावे. या इमारती तात्काळ रिकाम्या करून दुरुस्ती अथवा संरचनात्मक उपाययोजना तातडीने सुरू करावी आणि रहिवाशांना सुरक्षित पर्यायी निवासाची यंत्रणा सज्ज करावी, असे निर्बंध म्हाडाचे उपाध्य संजीव जयस्वाल यांनी दिले.(MHADA)
(हेही वाचा – Bhiwandi : धक्कादायक ! शोरमा, फालुदा खाल्ल्याने ८० जणांना विषबाधा, FDAकडून दुकान बंद; मालकावर गुन्हा दाखल )
संक्रमण शिबिरातील २९ भाडेकरूंचे स्थलांतर
मुंबई दुरुस्ती महामंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले, त्या ८६ इमारतींमध्ये २.२५६ निवासी आणि ४८० अनिवासी, असे एकूण २७३६ भाडेकरू आणि रहिवासी वास्तव्यास आहेत. पावसाळ्यात मुसळधार पाऊस, संरचनात्मक कमकुवतपणा, आणि संभाव्य दुर्घटनांचा धोका लक्षात घेऊन या सर्व नागरिकांचे तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करणे आवश्यक आहे.(MHADA)
रहिवाशांना पर्यायी जागेत हलवण्याचे प्रयत्न
धोकादायक इमारतींमधून स्थलांतरित होण्यासाठी मंडळाने उपलब्ध करून दिलेल्या पर्यायी निवास व्यवस्थेला काही रहिवाशांकडून प्रतिसाद मिळत नाही. स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांचे प्रबोधन करून त्यांना स्थलांतरित होण्यासाठी प्रवृत्त केले जाणार आहे. अतिधोकादायक इमारतींची नियमित पाहणी, आवश्यक निवासी ठिकाणी संरक्षक उपाययोजना, स्थानिक प्रशासनाशी समन्वय, आपत्कालिन प्रतिसाद यंत्रणेद्वारे जोखीम कमी करण्यावर भर दिला जात आहे.(MHADA)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
