Pawanraje Nimbalkar Murder Case: सबळ पुराव्यांअभावी पद्मसिंह पाटील निर्दोष! पवनराजे हत्या प्रकरणाच्या निकालाने निंबाळकर कुटुंबाला मोठा धक्का

Pawanraje Nimbalkar Murder Case: सबळ पुराव्यांअभावी पद्मसिंह पाटील निर्दोष! पवनराजे हत्या प्रकरणाच्या निकालाने निंबाळकर कुटुंबाला मोठा धक्का

125
Pawanraje Nimbalkar Murder Case
Pawanraje Nimbalkar Murder Case

तब्बल दोन दशकानंतर अखेर पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा (Pawanraje Nimbalkar Murder Case) निकाल लागला आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या कुटुंबाला या निकालामुळे मोठा धक्क बसला आहे. आरोपी पद्मसिंह पाटील आणि अन्य आठ आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. (Pawanraje Nimbalkar Murder Case)

हेही वाचा-love jihad: ५ मुलांचा बाप असलेला ‘राजू’ निघाला अशफाक! हिंदू विधवेला फसवलं

सबळ पुराव्या अभावी या आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. माफीचा साक्षीदार विश्वासू नसल्याने त्याच्या जबाबाच्या आधारावर आम्हाला आरोपींना शिक्षा देता येत नाही असं कोर्टाने म्हटलं. सगळ्या महाराष्ट्राचं या निकालाकडे लक्ष लागलं होतं. या हत्या प्रकरणात पद्सिंह पाटील आणि इतर 8 जण आरोपी होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार पद्सिंह पाटील यांच्यावर भाडोत्री गुंडांमार्फत हत्या घडवल्याचा आरोप होता. 3 जून 2006 रोजी पवनराजे मुंबईवरुन धाराशिवला निघालेले असताना दोन मारेकऱ्यांची कळंबोली येथे त्यांची गाडी अडवून धडाधड गोळ्या झाडल्या, त्यात पवनराजे आणि त्यांचा ड्रायव्हर समद काझी या दोघांचा मृत्यू झाला. (Pawanraje Nimbalkar Murder Case)

हेही वाचा- Longest Day: २१ जून रोजी का असतो वर्षातला सर्वात मोठा दिवस? वाचा सविस्तर

“कायद्याच्या चौकटीत राहून कोणतही कोर्ट निकाल देतं. रायगड कोर्टातही काहीवेळ केस चालली. एकूण 127 साक्षीदार तपासण्यात आले” अशी माहिती विशेष सीबीआय कोर्टाने दिली. पद्सिंह पाटील, लातूर येथील बिझनेसमन सतीश मंदादे, निवृत्त राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक मोहन शुक्ला आणि हल्लेखोर हे या प्रकरणात आरोपी होते. केस रेकॉर्डनुसार,मंदादे आणि शुक्ला यांनी पवनराजे निंबाळकर यांना मारण्यासाठी पारसमल जैनला 30 लाखाची सुपारी दिली. पारसमल जैन नंतर माफीचा साक्षीदार बनला. (Pawanraje Nimbalkar Murder Case)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.