एका ‘लव्ह जिहादी’ने (love jihad) एका विधवा हिंदू महिलेचे १० वर्षे शोषण केले. पाच मुलांचा बाप असलेल्या अशफाकने, राजीव असल्याचे भासवून तिच्याशी संबंध ठेवले. त्याने तिचे धर्मांतर केले आणि तिला मांस खायला घातले, ही उत्तर प्रदेशातील एक घटना आहे. (love jihad)
उत्तर प्रदेशातील (love jihad) मुझफ्फरनगरमध्ये धर्मांतर आणि फसवणुकीचे एक प्रकरण उघडकीस आले आहे. नोएडा येथे राहणाऱ्या एका विधवा हिंदू महिलेने आरोप केला आहे की, अशफाकने राजीव बलियान नावाचा हिंदू पुरुष असल्याचे भासवून तिच्याशी संबंध ठेवले. त्याने तिला धर्मांतर करण्यास भाग पाडले, तिच्याकडून नमाज वाचून घेतला. तिला मांस खायला घातले आणि तिचा फ्लॅट विकण्यासही भाग पाडले. पीडितेच्या म्हणण्यानुसार, ती २०१६ मध्ये एका राजकीय कार्यक्रमादरम्यान अशफाकला भेटली. त्यावेळी आरोपीने स्वतःची ओळख राजीव बलियान, उर्फ राजू, एक हिंदू म्हणून करून दिली. महिलेचे म्हणणे आहे की, पतीच्या मृत्यूनंतर ती एकटीच आपल्या मुलांचे पालनपोषण करत होती. परिस्थितीचा फायदा घेऊन आरोपीने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर तिला कळले की आरोपी मुस्लिम होता, त्याचे पूर्वी लग्न झाले होते आणि त्याला पाच मुले होती. (love jihad)
फ्लॅट विकल्याचा आणि इतर हिंदू महिलांना जाळ्यात अडकवल्याचा आरोप
त्या महिलेचा आरोप आहे की, आरोपीने तिला इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले आणि दीर्घकाळ तिची फसवणूक केली. तिच्या म्हणण्यानुसार, आरोपीने नोएडातील तिचा फ्लॅट विकण्यासही भाग पाडले, ज्यामुळे ती आर्थिक संकटात सापडली. पीडितेचा दावा आहे की, अशफाक इतर अनेक हिंदू महिलांनाही जाळ्यात अडकवून त्यांचे शोषण करत आहे. तिने, हिंदू संघर्ष समितीच्या सदस्यांसोबत एसएसपी कार्यालयात जाऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी अशफाक आणि इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीओ भोपा लक्ष्मण वर्मा यांच्या म्हणण्यानुसार, तक्रारीच्या आधारे संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई केली जात आहे. (love jihad)
Join Our WhatsApp Community

