“मेलोनी यांनी फोटो काढण्यासाठी भीक मागितली”; Donald Trump यांच्या विधानावर इटलीच्या पंतप्रधानांचे जळजळीत प्रत्युत्तर

"मेलोनी यांनी फोटो काढण्यासाठी भीक मागितली"; Donald Trump यांच्या विधानावर इटलीच्या पंतप्रधानांचे जळजळीत प्रत्युत्तर

112
Donald Trump
Donald Trump

आपल्या (Donald Trump) वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यावरून अमेरिका आणि इटलीमधील संबंध ताणले आहेत. जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांनी आपल्यासोबत एक फोटो काढण्यासाठी भीक मागितली, मला त्यांची कीव आली, असं वक्तव्य ट्रम्प यांनी केलं होतं. त्यावर आता मेलोनी यांनी प्रत्युत्तर दिलं. खोट्यालाही काही मर्यादा असतात, मी आणि इटली कुणासमोर भीक मागत नाही, अशा शब्दात मेलोनी यांनी त्यांचा संताप व्यक्त केला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर इटलीने त्यांचा अमेरिकाचा दौराही रद्द करत नाराजी व्यक्त केली आहे. (Donald Trump)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आपल्याच मित्र देशांसोबत अशा प्रकारचे वर्तन करतात, हे पाहून आपल्याला अत्यंत आश्चर्य आणि दुःख झाल्याचं मेलोनी यांनी म्हटलं आहे. त्यांची वक्तव्य म्हणजे निव्वळ थापा असतात, असंही मेलोनी म्हणाल्या. पंतप्रधान मेलोनी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “ट्रम्प यांचं वक्तव्य तथ्यांपासून कोसो दूर आहे. असं घडण्याची ही पहिलीच वेळ नाही, परंतु हे अत्यंत लज्जास्पद आहे. काही गोष्टींना तात्काळ उत्तर देणं अत्यंत गरजेचं असतं. डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान पूर्णपणे खोटं आहे. जेवढी सक्ती आणि कठोरपणा ट्रम्प आपल्या मित्र देशांच्या विरोधात दाखवतात, तेवढीच ठाम भूमिका ते पाश्चात्य देशांचे विरोधक आणि अमेरिकेच्या मुख्य प्रतिस्पर्ध्यांसमोर का दाखवत नाहीत? ट्रम्प हे अशा जागतिक नेत्यांबद्दल मवाळ भूमिका घेतात, ज्यांची धोरणे पाश्चात्य देशांच्या हिताच्या पूर्णपणे विरोधात आहेत.” (Donald Trump)

आपल्या भाषणाच्या शेवटी त्यांनी ट्रम्प यांना सर्वात कडक इशारा दिला. त्या म्हणाल्या, “एक गोष्ट त्यांनी नीट लक्षात ठेवावी, मी आणि इटली देश कधीही कोणाकडे भीक मागत नाही.” (Donald Trump)

ट्रम्प यांनी नेमका काय दावा केला होता?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत जी-7 शिखर परिषदेतील (G7 Summit) एका फोटोचा संदर्भ देत मेलोनी यांच्यावर टिप्पणी केली होती. ट्रम्प म्हणाले होते की, “जॉर्जिया मेलोनी यांनी जी-7 शिखर परिषदेत माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी अक्षरशः भीक मागितली. मला त्यांची दया आली, म्हणून मी त्यांच्यासोबत फोटो काढू दिला. मी तसे करण्यास नकारही देऊ शकलो असतो, पण मला त्यांची कीव आली. माझ्याशी बोलून कदाचित त्यांना खूप आनंद झाला असेल, वास्तविक मला त्यांच्याशी बोलण्याची कोणतीही गरज नव्हती.” (Donald Trump)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.