पाकिस्तानी मुल्ला Asim Munir ची जगाला अणू हल्ल्याची धमकी; म्हणाला, ‘आम्ही अर्धे जग…’

224

‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) नंतर पाकिस्तानची वाईट अवस्था झाली आहे. पण, भीक मागून जगणारा पाकिस्तान अजूनही सुधारलेला दिसत नाही. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल मुल्ला असीम मुनीर याने पुन्हा एकदा भारताला अणुहल्ल्याची धमकी (Nuclear Threat) दिली आहे. अलीकडेच एका कार्यक्रमात बोलताना मुनीरने हे गंभीर विधान केले. ‘जर पाकिस्तानच्या अस्तित्वावर संकट आले, जर आम्ही बुडणार असलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाऊ’ अशी धमकी मुनीरने दिली. अमेरिकेतील टाम्पा (Tampa) येथे उद्योगपती अदनान असद यांनी आयोजित केलेल्या डिनरमध्ये बोलताना ही धमकी दिली. या विधानामुळे भारत-पाकिस्तान संबंधांमधील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. यासोबतच, मुनीरने भारताने सिंधू पाणी करार रद्द (Indus Water Treaty) करण्याच्या निर्णयावरही कठोर टीका केली. (Asim Munir )

(हेही वाचा – ‘क’ फॉर काबा, ‘म’ फॉर मस्जिद; Baby Convent School मध्ये मुलांना इस्लामिक शिक्षण; शाळेचा परवानाच रद्द करण्याची मागणी)

भारताला अणुहल्ल्याची धमकी आणि सिंधू पाणी करार
लष्करप्रमुख मुनीरचे हे विधान भारताने सिंधू पाणी करार निलंबित केल्याच्या पार्श्वभूमीवर आले आहे. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, भारताच्या या कृतीमुळे 25 कोटी पाकिस्तानी लोकांच्या उपजीविकेवर आणि पाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे. मुनीरने पाण्याला पाकिस्तानची ‘रेड लाईन’ (Red Line) मानले आहे आणि यावर कोणताही समझोता केला जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

पाकिस्तानची अण्वस्त्र धमकीची पार्श्वभूमी
पाकिस्तानकडून भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देण्याचा हा काही पहिलाच प्रसंग नाही. यापूर्वीही अनेकवेळा पाकिस्तानच्या राजकीय आणि लष्करी नेतृत्वाने अशी विधाने केली आहेत. तज्ञांच्या मते, भारताच्या ‘नो फर्स्ट यूज’ (No First Use) या अण्वस्त्र धोरणाच्या उलट, पाकिस्तानने ‘फर्स्ट यूज’ (First Use) ची शक्यता नाकारलेली नाही. पाकिस्तानी नेतृत्वाचे असे आक्रमक धोरण आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता निर्माण करते.

(हेही वाचा – रुग्णवाहिका ३ तास एकाच जागी उभी; वाहतूक कोंडीमुळे Mumbai-Ahmedabad highway वर महिलेचा तडफडून मृत्यू)

भारताची कणखर भूमिका आणि भविष्यातील आव्हान
भारताने पाकिस्तानच्या या धमक्यांना नेहमीच गांभीर्याने घेतले आहे. भारताने वेळोवेळी स्पष्ट केले आहे की, कोणत्याही प्रकारच्या गैरकृत्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देणे हे केवळ पाकिस्तानची हतबलता दर्शवते. सिंधू पाणी करारावर भारताने घेतलेली भूमिका ही त्यांच्या देशांतर्गत सुरक्षेशी जोडलेली आहे. भविष्यात अशा धमक्यांकडे दुर्लक्ष न करता भारताला आपल्या सीमा आणि नागरिकांच्या संरक्षणासाठी सज्ज राहावे लागेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.