Devendra Fadnavis : एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री राहणार

शिवसेना अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांनी योग्य निर्णय दिल्याचे सांगून राहुल नार्वेकर यांचे त्यांनी स्वागत केले. आमचे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील, असाही विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

260
DCM Devendra Fadnavis : संरक्षण उद्योगांना चालना देण्यासाठी नवे धोरण तयार करण्यात येईल

राज्याच्या मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदेच कायम राहणार, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली. शिवसेना अपात्रता प्रकरणावर (MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्षांनी योग्य निर्णय दिल्याचे सांगून राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांचे त्यांनी स्वागत केले. आमचे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल, एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हेच मुख्यमंत्री राहतील, असाही विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Devendra Fadnavis)

फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, विधानसभा अध्यक्षांनी बुधवारी दिलेला निकाल अतिशय कायदेशीर आहे. अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखालची जी शिवसेना आहे तिलाच मूळ पक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे, आणि त्याला वैध ठरवले आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच आमचे सरकार स्थिर असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत आता कोणाच्या मनात काही शंका असल्याचे कारण नाही, हेच सरकार कार्यकाळ पूर्ण करणार आहे. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हेच मुख्यमंत्री राहणार आहेत. (Devendra Fadnavis)

(हेही वाचा – Parliament Budget Session 2024 : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून)

कुणाच्या मनात सरकारच्या स्थैर्याबाबत शंका राहण्याचे कारण नाही – फडणवीस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वात हे सरकार मजबुत आणि भक्कम आहे, असे आम्ही प्रारंभीपासूनच सांगत होतो. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सुद्धा आपल्या आदेशात हे सरकार बरखास्त करण्याचा कुठलाही आदेश देण्याची गरज नाही, असे स्पष्ट केले होते. पण, काही लोक मुद्दाम आणि वारंवार सरकारबाबत गैरसमज पसरवून राज्यातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत होते. विधानसभाध्यक्षांनी विविध नियमांचा दाखला घेत निकाल दिला आहे, त्यानंतर आतातरी कुणाच्या मनात सरकारच्या स्थैर्याबाबत शंका राहण्याचे कारण नाही, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. (Devendra Fadnavis)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.