विधान परिषदेत विरोधकांकडून राष्ट्रपुरुषांच्या अवमानाचा मुद्दा, फडणवीसांनी वीर सावरकरांच्या अपमानाची करून दिली आठवण

139

विधान परिषदेत ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी राष्ट्रपुरुषांच्या अवमानाचा मुद्दा उपस्थित केला. राज्यपाल आणि भाजपच्या नेत्यांकडून केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा उल्लेख केला, त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार परब यांना वीर सावरकर यांचा झालेल्या अवमानाचा विसर पडला. राहुल गांधी वेळ सावरकरांचा अवमान करतात आणि स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारे त्यांच्या गळ्यात गळे घालून फिरतात, असा टोला हाणला.

राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांचा अवमान केला, त्यासंदर्भात कुणी बोलत नाही. वीर सावरकर यांना भारतरत्न मिळाला नाही तरी चालेल, पण कमीत कमी त्यांचा अपमान तरी थांबवा. आमदार वीरेंद्र जगताप काय म्हणतात, गलिच्छ, नीच राजकरण करणारा सावरकर याला आम्ही स्वातंत्र्यवीर का म्हणायचे? यावर कुणीच का भाष्य करत नाही, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा …आणि नितेश राणेंनी रेशीम बागेत संघाची परंपरा जोपासली)

छत्रपती शिवाजी महाराजा आणि इतर युग पुरूषांपेक्षा कोणीही मोठा नाही. उत्तर प्रदेशमध्ये युगपुरूषांचा अपमान करणाऱ्यांवर कायदा आणला. आपणही असा कायदा आणाला पाहजे. हा कायदा आपल्याकडे आणला तर महापुरूषांबाबत बोलताना प्रत्येक जण विचार करतील. मंत्रीमंडळात नंबर लावण्यासाठी काही जण अशी वक्तव्य करत आहेत. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मान कापली तरी चालेल पण महाराजांचा अवमान सहन करणार नाही असे म्हणतात. मात्र, महाराष्ट्रात अवमानाची मलिकाच सुरू आहे, त्यामुळे याबाबत कायदा आणावा अशी मागणी अनिल परब यांनी केली. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधातील काही नेत्यांनी केलेल्या वक्तव्याचा पाडाच वाचून दाखवला. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सडेतोड उत्तर देताच विरोधकांनी गोंधळ घातला, त्यामुळे विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

काय म्हणाले फडणवीस? 

राज्यात कोणत्याच महापुरुषांचा अपमान होणे योग्य नाही. महापुरुषांचा अपमान होऊ नये यासाठी एक विधेयक आणण्याची मागणी काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांनी केली आहे. तसे पत्र देखील दिले आहे. परंतु, विरोधकांकडून काही जणांनी मागणी केली की, उदयनराजे खरचं शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत का याचे पुरावे द्या. असेच एक महिला नेत्या म्हणाल्या की, संजय राऊत यांच्या मातोश्री मा जिजाऊ सारख्या आहेत असे म्हटले आहे. तुम्ही गाय मारली म्हणून आम्ही वासरू मारावे हे योग्य नाही. सभागृहात वस्तुस्थिती मांडताना दोन्ही बाजूने मांडावी. ज्या वारकरी संप्रदायाने जाती विरहीत समाज घडवला. त्यांना कधीही जात विचारली नाही. राहुल कनाल यांनी शिवाजी महाराजांच्या फोटोच्या जागी आदित्य ठाकरे यांचा फोटो लावला होता, असे सांगत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी देवतांबद्दल केलेल्या वक्तव्यांचा पाडाच वाचला.

(हेही वाचा सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या नव्हे हत्या; शवविच्छेदनाच्या वेळी उपस्थित कर्मचाऱ्याचा खुलासा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.