Dadar Railway Station : दादरचे फलाट छताविना, चटके खाणाऱ्या प्रवाशांवर आता पावसाळात भिजण्याची वेळ

दादर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ४ वरील काही भागांमध्ये फलाटावर छप्परच बसवण्यात आलेले नाही. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात कडक उन्हातून चालत जिने गाठणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना आता पावसाळयात मात्र या छत अभावी भिजण्याची वेळ येणार आहे.

443
Dadar Railway Station : दादरचे फलाट छताविना, चटके खाणाऱ्या प्रवाशांवर आता पावसाळात भिजण्याची वेळ
Dadar Railway Station : दादरचे फलाट छताविना, चटके खाणाऱ्या प्रवाशांवर आता पावसाळात भिजण्याची वेळ
विशेष प्रतिनिधी,मुंबई

मुंबईत सध्या रेल्वे स्थानकावरील छत उभारण्यावर भर दिला जात असला तरी प्रत्यक्षात पश्चिम रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकाच्या (Dadar Railway Station) फलाट क्रमांक ४ वरील काही भागांमध्ये फलाटावर छप्परच बसवण्यात आलेले नाही. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात कडक उन्हातून चालत जिने गाठणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना आता पावसाळयात मात्र या छत अभावी भिजण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे उन्हापासून आपल्या प्रवाशांचे रक्षण करू न शकणारे पश्चिम रेल्वे किमान या पावसाळ्यात तरी या फलाट क्रमांक ४वर छत बांधणार आहे का असा सवाल रेल्वे प्रवाशांकडून केला जात आहे.

WhatsApp Image 2024 06 02 at 5.15.54 PM

पश्चिम रेल्वेच्या दादर रेल्वे लोकल स्थानकाच्या (Dadar Railway Station) फलाट क्रमांक ४वरील चर्चगेटच्या दिशेला पुढील तीन ते चार डब्यांच्या परिसरात फलाटावर छतच बसवलेले नाही. चर्चगेटच्या दिशेला पहिल्या फर्स्ट क्लास डब्याच्या पासून ईएमयु पर्यंतच्या भागांत फलाटावर हे छत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात पुढील डब्यात बसणाऱ्या प्रवाशांना तीन डबे मागेच छताखाली सावलीत उभे राहण्याची वेळ येत आहे. तर पुढील भाग छत नसल्याने उन्हापासून बचाव करणारे प्रवाशी जिन्याशेजारीच गर्दी करत असल्याने लोकलमधून उतरणाऱ्या प्रवाशांना या गर्दीमुळे जिना चढताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

(हेही वाचा – America Firing: अमेरिकेत थरकाप उडवणारी घटना! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार, एकाच मृत्यू )

WhatsApp Image 2024 06 02 at 5.15.54 PM 1

मात्र, उन्हाळ्यात प्रवाशांची या छताअभावी गैरसोय होत असल्याने तसेच त्यांना याचे चटके लागत असतानाही रेल्वे प्रशासनाला याठिकाणी छत बांधण्याचे प्रयत्न करता आलेले नाही. परंतु पावसाळा येत्या काही दिवसांवरच आला असून पुढील तीन डब्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर पावसाळ्यात भिजण्याची वेळ येणार आहे. छत नसल्याने पावसात लोकलमधून उतरणाऱ्या प्रवाशांना भिजतच जिना गाठावा लागणार किंवा छत्रींचा वापर केल्यास मोठ्याप्रमाणात गर्दी होण्याची भीती वर्तवली जात आहे. रेल्वे प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, सध्या चर्चगेटच्या दिशेला या फलाटावर छत नसल्याने उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. परंतु पावसाळ्यात ही प्रवाशांची चिंता अधिकच वाढली जाणार आहे. एकाबाजुला ऊन,पावसापासून बचाव व्हावा म्हणून फलाटांवर छत बसवले जाते. दादरमधील सर्व फलाटांवर छत आहे, तर मग फलाट क्रमांक ४वर छत का नाही असा सवाल व्यक्त करत प्रवाशांना आधी उन्हात चटके खायला लावले आणि आता पावसात भिजायला लावणार का असाही सवाल केला. (Dadar Railway Station)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.