Deepak Talkies: प्रभादेवी येथील दीपक सिनेमागृह बंद होण्याच्या मार्गावर?

110
Deepak Talkies: प्रभादेवी येथील दीपक सिनेमागृह बंद होण्याच्या मार्गावर ?

मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ गाजवणाऱ्या ‘दीपक सिनेमागृह’ आता अखेरच्या घटका मोजत आहेत. एकेकाळी या सिनेमागृहात मराठी, हिंदी, भोजपुरी चित्रपटांचे माहेरघर म्हणून ओळखले जात होते. मुंबईतील प्रभादेवी (Mumbai Prabhadevi) येथे दीपक सिनेमागृह असून, या सिनेमागृह मागील अनेक दिवसांपासून बंद आहे.  (Deepak Talkies)

गिरणी कामगारांची (mill worker) वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालबाग, परेल भागाच्या मध्यवर्ती ‘दीपक सिनेगृह’ आहे. कोरोनाच्या काळापासून हा सिनेमागृह बंद आहे. यापुढे या सिनेमागृहाची दारे उघडण्याची शक्यता कमी धूसर होत चालली आहे. मागील ९८ वर्षांचा इतिहास या सिनेमगृहाला लागला आहे. ठोकरशी शाह यांनी उभारलेल्या या सिनेमागृहाला पूर्वी ‘सरस्वती सिनेमागृह’ (Saraswati Cinema) म्हणून ओळखले जात होते. त्या काळात चित्रपट हे ताडपत्री खाली बसून पाहायचे.

(हेही वाचा – America Firing: अमेरिकेत थरकाप उडवणारी घटना! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार, एकाच मृत्यू )

६०च्या दशकात याचे नामकरण दीपक टॉकीज (Deepak Talkies) असे करण्यात आले. काळानुरूप यात बदल करण्यात आले आणि ताडपत्रीची जागा लाकडी खुर्थ्यांनी घेतली. २० हजार स्क्वेअर फूट क्षेत्रात असलेल्या सिनेमागृहाचा कोरोनापूर्व काळात कार्निव्हलने कायापालट केला, मल्टिप्लेकसारखी आरामदायी आसनव्यवस्था इथे बसविण्यात आल्या. कालांतराने या सिनेमागृहात १५० पासुन ३०० रुपयांपर्यंत चित्रपटांचे तिकीट उपलब्ध होत असे. हे तिकीटदर प्रभादेवी, लोअर परेल, करी रोड, वरळी भागांतील सर्वसामान्य जनतेच्या खिशाला परवडणारे होते. कालांतराने या सिनेमागृहात प्रेक्षकांची गर्दी वाढत होती. पण कोरोनानंतर हा सिनेमागृह सुरूच झाला नाही.     

(हेही वाचा – उत्तर प्रदेशात Love Jihad; हिंदू तरुणीशी जबरदस्तीने ‘निकाह’ करून मुंबईत धर्मांतर केले आणि लैंगिक अत्याचार)

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, सध्या दीपक टॉकीजची अवस्था खूप वाईट आहे. बंद (Deepak Talkies Closed) असल्याने खुर्च्यापासून प्लॅस्टर, वातानुकूलित यंत्रणा, प्रोजेक्टर, स्क्रीन, स्वच्छतागृहे, रंगरंगोटी तसेच पूर्णपणे नूतनीकरणाचे काम केल्याखेरीज हे सिनेमागृह प्रेक्षकांच्या सेवेत रुजू करणे शक्य नाही. सध्याची इतर चित्रपटगृहांची आर्थिक अवस्था पाहता या कामांसाठी खर्च करण्याची सिनेमागृह व्यवस्थापनाची मानसिकता नाही. त्यामुळे सिनेमागृह भविष्यात खुले होईल याची शक्यता नसल्याचे एकपडदा सिनेमागृहांशी निगडित व्यक्तीचे म्हणणे आहे. (Deepak Talkies)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.