Arunachal Pradesh च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांचे 3 उमेदवार विजयी

156

लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गटाला विशेष यश मिळणार नाही असे चित्र आहे. असे असतानाच अजित पवार यांना अरुणाचल प्रदेशच्या (Arunachal Pradesh) विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये आनंदाची बातमी मिळाली आहे. तेथील विधानसभेचा निकाल लागला असून या ठिकाणी तीन आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने सीमापार झेंडा फडकवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

अरुणाचल प्रदेशात 41 जागांवर BJP चा विजय

विधानसभेची मुदत संपत असल्याने अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवारीच पार पडली. अरुणाचल प्रदेशात विधानसभेच्या एकूण 60 जागा आहेत. यामध्ये भाजपने तब्बल 41 जागा जिंकत घवघवीत यश मिळवले. अन्य पाच जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर असल्याने विजयी जागांचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा उत्तर प्रदेशात Love Jihad; हिंदू तरुणीशी जबरदस्तीने ‘निकाह’ करून मुंबईत केले धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार)

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची कमाल

अरुणाचल प्रदेशच्या (Arunachal Pradesh) विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकूण 15 उमेदवार उभे होते. यापैकी तीन जण निवडून आले आहेत. तर एक उमेदवार फक्त 2 मतांनी पडला आहे. दुसरा उमेदवार 200 मतांनी पडला आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष असून या ठिकाणी 46 आमदार जिंकत भाजपने विधानसभेतील आपली सत्ता राखली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.