PM Narendra Modi : जगभरात पुन्हा एकदा पंतप्रधान मोदीच ‘भारी’

212

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची लोकप्रियता सध्या जगभरात वाढत जात आहे. विविध सर्वेक्षण अहवालातून पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेचे मापदंड जाहीर होत असतात. पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी हे जगभरात भारी ठरले आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ट्विट करून याची माहिती दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांच्या यादीत मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचेच वर्चस्व कायम राहिले आहे. जागतिक सर्वेक्षणात 78% लोकप्रियतेसह मा. मोदीजी पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरल्याने ‘मोदी की गॅरंटी’ वर शिक्कामोर्तब झाले आहे.

(हेही वाचा Assam Government : आसाममध्ये मुस्लिम विवाह आणि घटस्फोट कायदा रद्द; हिमंता सरकारचे UCC कायद्याच्या दिशेने पहिले पाऊल)

कोणत्या नेत्याची किती लोकप्रियता? 

  • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची लोकप्रियता ७८ टक्के
  • अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांची लोकप्रियता ३७ टक्के
  • कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची लोकप्रियता २९ टक्के
  • ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची लोकप्रियता २५ टक्के
  • जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांची लोकप्रियता २१ टक्के

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.