Indi Alliance : इंडि आघाडीत कुणाकडेही पंतप्रधान होण्याची क्षमता नाही; माजी पंतप्रधानांचे महत्वाचे विधान

157

नरेंद्र मोदी देशाचे पुढचे पंतप्रधान होतील, विरोधी पक्षातील इंडि आघाडीत (Indi Alliance) कोणत्याही नेत्यात भारताचा पंतप्रधान होण्याची क्षमता नाही. नरेंद्र मोदीच देशाचे पंतप्रधान होऊ शकतात. पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी, हेच एकमेव पर्याय आहेत, असे मत माजी पंतप्रधान आणि जेडीएसचे प्रमुख एचडी देवेगौडा यांनी व्यक्त केले.

(हेही वाचा Hema Malini यांच्यावर अश्लिल टिपण्णी; सुरजेवाला यांच्यावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई)

काय म्हणाले देवेगौडा?

नरेंद्र मोदी पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान होतील, कारण संपूर्ण देशाचा त्यांना पाठिंबा आहे. जेडीएस आणि भाजप लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी एकत्र काम करतील. ‘कर्नाटकला 200 वर्षांत न्याय मिळाला नाही’ कर्नाटकात काँग्रेसच्या ‘न्याय देण्याच्या आश्वासना’चा खरपूस समाचार घेताना ते म्हणाले की, गेल्या 200 वर्षांपासून कर्नाटकाला न्याय मिळाला नाही. कावेरी पाणी वादाचा संदर्भ देत ते म्हणाले की, आता तो सुटेल अशी आशा आहे. कर्नाटकला न्याय देऊन कावेरी समस्येचे निराकरण कोणी करू शकत असेल, तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. आमचे दोन्ही पक्ष एकत्र राहतील आणि मिळून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतील, असेही ते यावेळी म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.